शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

एर्टिगाचं नवंकोरं, हायटेक मॉडेल लाँच, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 12:20 PM

आपल्याला जर नवीन कार घ्यायची आहे, तर आजच मारुती सुझुकीची एर्टिगा ही कार लाँच झाली आहे. Maruti Ertigaच्या 2018चे नवे मॉडल आज ग्राहकांच्या सेवेत आलं आहे.

मुंबई- आपल्याला जर नवीन कार घ्यायची आहे, तर आजच मारुती सुझुकीची एर्टिगा ही कार लाँच झाली आहे. Maruti Ertigaच्या 2018चे नवे मॉडल आज ग्राहकांच्या सेवेत आलं आहे. मारुतीनं एर्टिगाचं हे मॉडेल अद्ययावत असून, त्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. लूकमध्ये तर ही कार फारच स्टायलिश दिसतेय. या सेकंड जनरेशन एमपीवी कारचं लूक पहिल्याच्या मॉडेलपेक्षा जबरदस्त आहे.विशेष म्हणजे एर्टिगाच्या इंजिनमध्येही बदल करण्यात आला आहे. जुन्या एर्टिगामध्ये 1.3 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलं होतं. परंतु नव्या मॉडेलमध्ये 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे. नवी एर्टिगा फारच आकर्षक आणि क्लासिक दिसत आहे. या एर्टिगाच्या पुढच्या भागात मोठं क्रोम ग्रिल, स्लीक हेडलँप आणि नव्या अलॉय व्हिलला पहिल्यापेक्षा चांगलं लूक दिलं आहे. तसेच मागच्या भागात वॉल्व्हो गाड्यांसारखे टेल लँपही देण्यात आले आहेत. या व्हॉल्वो गाड्यांसारख्या टेल लँपमुळे या एर्टिगाला एक वेगळीच चकाकी आली आहे. विशेष म्हणजे एकदम मागच्या बाजूला बसणाऱ्या लोकांना भरपूर स्पेस(जागा) मिळणार आहे.

या एर्टिगाचा बूट स्पेस वाढवला असून, 135 लिटरहून 153 लीटर करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचं ब-यापैकी सामान डिक्कीत राहू शकणार आहे. तसेच या एर्टिगामधल्या सर्वात शेवटच्या म्हणजे मागच्या भागातील सीट फोल्ड करता येणार आहे. जेव्हा तुम्हाला डिक्कीत जास्त स्पेस हवा असेल, तेव्हा तुम्ही ती सीट फोल्ड करू शकता. या नव्या एर्टिगामधअये ऑडी गाड्यांसारखं डॅशबोर्ड देण्यात आलं आहे. या डॅशबोर्डमुळे गाडी एकदम रॉयल वाटते. मारुतीनं या नव्या मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचं नवं फीचर दिलं आहे.
या गाडीमध्ये स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, अँड्राइड ऑटो अन् अॅपल कार प्लेसारख्या फीचर्सचा समावेश आहे. पुढच्या दोन सीटसाठी दोन एअरबॅग्स देण्यात आल्या असून, ABS आणि EBD सारख्या तंत्रज्ञानानं युक्त आहेत. अद्ययावत मॉडेलमध्ये 105 पीएस पॉवर दमदार इंजिन असून, ते 138 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करेल. तर 1.2 लीटर डिझेल इंजिनला 90 पीएस पॉवर देण्यात आली असून, ते 200 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करेल.
एर्टिगाच्या गिअरबॉक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. मारुती एर्टिगा 2018 ही Honda BR-Vला टक्कर देणार आहे. परंतु नव्या एर्टिगाची किंमत जुन्या एर्टिगापेक्षा जास्त असेल. या नव्या एर्टिगाची किंमत 7 लाखांपासून सुरू होणार असून, ती 11 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी