नवी दिल्ली : ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदीचा मोठा फटका बसला आहे. दोन दशकांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने पहिल्यांदाच मंदीचा सामना केला आहे. याआधी 2000 मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदाचा फटका बसला होता. यामुळे Maruti Suzuki ने 3 हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले की, मंदीमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. सध्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. काही खासगी वृत्तवाहिन्यांना त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, हा व्यवसायाचा एक भाग आहे. जेव्हा मागणी वाढते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले जाते. जेव्हा मागमी घटते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाते.