शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

Car Discount Offers : शानदार ऑफर्स! Maruti च्या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:49 IST

Maruti Cars Discounts July 2022 : या ऑफर्स कंपनीच्या Alto, Celerio, Swift, Wagon R आणि S-Presso हॅचबॅकवर उपलब्ध आहेत. मात्र, CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.

नवी दिल्ली :  मारुती सुझुकी या महिन्यात (जुलै 2022) आपल्या अरिना रेंज मॉडेल्सवर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. या ऑफर्स कंपनीच्या Alto, Celerio, Swift, Wagon R आणि S-Presso हॅचबॅकवर उपलब्ध आहेत. मात्र, CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.

याचबरोबर, Ertiga फेसलिफ्ट MPV वर कोणतीही सूट लागू नाही. तर वेगवेगळ्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. Maruti Suzuki Celerio आणि Maruti Suzuki Wagon R वर 25,000 रुपयांपर्यंत ऑफर्स आहेत. Celerio अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, या सर्वांमध्ये 1.0-लिटर K10C (67hp) पेट्रोल इंजिन मिळत आहे. तसेच, Wagon R मध्ये दोन इंजिन ऑप्शन- 1.0-लीटर पेट्रोल आणि 1.2-लीटर K12C DualJet पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे.

याशिवाय, मारुती सुझुकी स्विफ्टवर 18,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स आहेत. स्विफ्ट आपल्या किफायतशीर इंजिन, राइड आणि हँडलिंग बॅलन्ससाठी ओळखली जाते. यात 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (90hp) मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच, मारुती सुझुकी ऑल्टो 800 वर 23,000 रुपयांपर्यंत ऑफर्स उपलब्ध आहेत. ऑल्टो फक्त 796cc इंजिनसह येते.

मारुती सुझुकी Eeco वर 20,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स मिळत आहेत. मारुती सुझुकीच्या परवडणाऱ्या MPV Eeco मध्ये 1.2-लिटर इंजिन (73hp, 98Nm) युनिट उपलब्ध आहे. हे 5-सीटर, 7-सीटर आणि कार्गो व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि या सर्व व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपर्यंत सूट आहे. याशिवाय मारुती सुझुकी डिझायरवर 15,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. 

मारुती सुझुकी डिझायर ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. ही मारुती स्विफ्टवर आधारित सेडान आहे. मारुती सुझुकी S-Presso वर तुम्ही 20,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यात 1.0-लिटर इंजिन (68hp) आहे. S-Presso च्या सर्व व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला याठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की, कोणत्याही कारच्या CNG व्हेरिएंटवर ऑफर्स नाहीत.

(टीप- ऑफर्स या शहर आणि डीलरच्या आधारावर बदलू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी डीलरशी संपर्क साधा.)

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग