मारुती बलेनो ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक कारपैकी एक आहे. सणासुदीच्या हंगामात जर तुम्ही बलेनो खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जीएसटी दरातीनंतर, ही कार आता आणखीनच किफायतशीर झाली आहे. जीएसटी 28 टक्के अधिक (प्लस) सेसवरून 18 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने बलेनोची सुरुवातीची किंमत आता केवळ 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) वर आली आहे.
अशा आहेत व्हेरिएंटनुसार नव्या किमती -बलेनोच्या सिग्मा व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये, डेल्टा व्हेरिएंट 6.79 लाख रुपये, डेल्टा सीएनजी 7.69 लाख रुपये आणि झेटा सीएनजी (Zeta CNG) 8.59 लाख रुपये आहे. याशिवाय ऑक्टोबर 2025 मध्ये 70,000 रुपयांपर्यंतची सूटही मिळत आहे, यामुळे ही खरेदी आणखी आकर्षक ठरते.
वैशिष्ट्ये आणि इंजिनसंदर्भात -बलेनोमध्ये हाइट-ॲडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 6 एअरबॅग्स यांसारखी खास वैशिष्ट्ये मिळतात. यातील बहुतांश फीचर्स टॉप मॉडेल्स किंवा उच्च व्हेरिएंट्समध्येच उपलब्ध आहेत. यात 1.2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 89 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 76 बीएचपी पॉवर आणि 98.5 एनएम टॉर्क देते.
मायलेज -कंपनीच्या दाव्यानुसार, सीएनजी व्हेरिएंट एका किलोग्रॅमवर 30.61 किमी मायलेज देते. पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 21.01 ते 22.35 किमी/लिटर, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 22.94 किमी/लिटर मायलेज देते. या कारला 37-लिटर पेट्रोल आणि 55-लिटर सीएनजी टँक देण्यात आला आहे. हा टँक फुल केल्यानंतर 1200 किमीपर्यंत प्रवास शक्य आहे.
महत्वाचे म्हणजे, भारतीय बाजारात बलेनो, टाटा अल्ट्रॉझ, ह्युंदाई i20, टोयोटा ग्लॅन्झा आणि मारुती स्विफ्ट यांना टक्कर देते.
Web Summary : Maruti Baleno's price now starts at ₹5.99 lakhs (ex-showroom) due to GST reductions. October discounts reach ₹70,000. Features include height-adjustable driver seat, automatic climate control, and six airbags. CNG offers 30.61 km/kg mileage. It rivals Tata Altroz and Hyundai i20.
Web Summary : मारुति बलेनो की कीमत जीएसटी कटौती के बाद ₹5.99 लाख से शुरू। अक्टूबर में ₹70,000 तक की छूट। इसमें हाइट-एडजस्टेबल ड्राइवर सीट, ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल और छह एयरबैग जैसे फीचर्स हैं। सीएनजी 30.61 किमी/किग्रा का माइलेज देती है। यह टाटा अल्ट्रोज और हुंडई i20 को टक्कर देती है।