मारुती अल्टोवर मिळतेय शानदार सूट, जाणून घ्या किती होणार बचत?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:34 AM2023-07-15T10:34:19+5:302023-07-15T10:34:43+5:30

मारुती अल्टो जुलै २०२३ च्या सवलतीबद्दल सविस्तर जाणून घ्या....

maruti alto offered heavy discounts in july 2023 | मारुती अल्टोवर मिळतेय शानदार सूट, जाणून घ्या किती होणार बचत?

मारुती अल्टोवर मिळतेय शानदार सूट, जाणून घ्या किती होणार बचत?

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील बजेट कारच्या लिस्टमध्ये मारुती अल्टोचे स्थान खूप चांगले आहे. मारुती अल्टो या महिन्यात ग्राहकांना खरेदी करणे अधिक परवडणारे आहे. कारण मारुती अल्टोवर सध्या प्रचंड सूट मिळत आहे. जर तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. तर मारुती अल्टो जुलै २०२३ च्या सवलतीबद्दल सविस्तर जाणून घ्या....

एरिना आणि नेक्सा मालिकेतील काही मारुती सुझुकी डीलर्स या महिन्यात निवडक मॉडेल्सवर सूट देत आहेत. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट या स्वरूपात लाभ मिळू शकतात. यामध्ये मारुती अल्टोच्या नावाचाही समावेश आहे.

व्हेरिएंटनुसार जुलै 2023 सवलत लिस्ट! 
अल्टो पेट्रोल एमटी व्हेरिएंटवर 40,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. सीएनजी एमटी व्हेरिएंटवर 20,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. मारुती अल्टो K10 चे पेट्रोल एएमटी व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सवलतसह उपलब्ध आहे.

ही कार किती सुरक्षित आहे?
एप्रिलमध्ये ग्लोबल एनसीओपी क्रॅश टेस्टमध्ये अल्टोला दोन-स्टार रेटिंग मिळाले. गेल्या वर्षी क्रॅश टेस्ट अहवालात बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याला शून्य रेटिंग मिळाले होते. कारच्या बॉडी शेलला स्थिर दर्जा देण्यात आल्याचे म्हटले जाते. दरम्यान, नवीनतम उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी भारतीय ब्रँडची एंट्री-लेव्हल हॅचबॅक एप्रिल 2023 मध्ये अपडेट करण्यात आली.

कशी होते चाचणी?
क्रॅश टेस्ट करण्यासाठी कारच्या आत एक डमी ठेवला जातो. हा डमी माणसाप्रमाणे कारमध्ये बसवला जातो. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये, कार 64 किमी प्रतितास वेगानं चालविली जाते आणि समोरील बॅरिअरवर धडकवली जाते. ही टक्कर अशा लेव्हलची असते जसं समान वजनाची दोन वाहनं ताशी 50 किलोमीटर वेगानं एकमेकांना धडकतात. क्रॅश चाचणी अनेक प्रकारे करण्यात येते. ज्यात फ्रंटल, साईडल, रिअर आणि पोल टेस्ट यांचा समावेळ आहे. फ्रंटल टेस्टमध्ये कार समोरच्या बाजूने आदळवली जाते. साईडल टेस्मटमध्ये साईनं, रिअर टेस्टमध्ये मागील बाजूनं आदळवतात आणि पोल टेस्टमध्ये कार वरील बाजून पाडली जाते. 

कशी मिळते रेटिंग?
एनकॅप अंतर्गत कारला 0 ते 5 दरम्यान स्टार रेटिंग दिली जाते. जितकं अधिक रेटिंग तितकी कार सुरक्षित मानली जाते. हे रेटिंग ॲडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन, चाईल्ड ऑक्युपमेंट प्रोटेक्शन स्कोअरवर आधारित आहे.

ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन
यासाठी 17 गुण ठेवण्यात आले आहेत. आदळताना व्यक्तीच्या शरीराला होणाऱ्या दुखापतींच्या आधारे यात गुण दिले जातात. यासाठी त्याची 4 भागांमध्ये विभागणी केली जाते.
- हेड अँड नेक
- चेस्ट अँड क्नी
- फिमर अँड पेल्विस
- लेग अँड फूट
 
चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन
यासाठी 49 गुण ठेवण्यात आले आहेत. यासाठी कारमध्ये 18 महिन्यांचं बाळ आणि 3 वर्षांच्या मुलाचा डमी ठेवला जातो. कारमध्ये चाईल्ड रेस्ट्रेंट सिस्टम मार्किंग, थ्री पॉईंट सीट बेल्ट आणि ISOFIX साठी अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत.

Web Title: maruti alto offered heavy discounts in july 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.