शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

मारुतीची अल्टो ८०० - शहरी वाहतुकीतील कोंडीतूनही वाट काढणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 08:00 IST

मारुतीची अल्टो ८०० ही मारुतीची सध्याची सर्वात छोटी कार म्हणावी लागते. विशेष करून शहरी भागामध्ये गेल्या काही काळापासून सीएनजीवर चालणाऱ्या मारुती ८०० या कारला जास्त पसंती मिळत गेली

ठळक मुद्देमुंबई, पुणे या शहरांमध्ये अनेकांना शहरातील वापरासाठी ही निवडलीमुळात अल्टोसारखी कार मारुतीच्या ब्रॅँडनेममुळे जास्त लोकप्रिय झालीसाधारण ५ ते साडेपाच फुटांपर्यंत उंची असणाऱ्यांसाठी ही कार बऱ्यापैकी आरामदायी असू शकते

मारुतीची अल्टो ८०० ही मारुतीची सध्याची सर्वात छोटी कार म्हणावी लागते. विशेष करून शहरी भागामध्ये गेल्या काही काळापासून सीएनजीवर चालणाऱ्या मारुती ८०० या कारला जास्त पसंती मिळत गेली. बसायला फार आरामदायी नसली तरी शहरी प्रवासामध्ये किंवा जवळच्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी मारुतीची ही कार अनेकांनी पसंत केली. विशेष करून सीएनजी व त्यावर मिळणाऱ्या किंमतीच्या तुलनेतील चांगल्या मायलेजसाठी मारुतीची अल्टो ८०० ला जास्त पसंती मिळाली.

मुंबई, पुणे या शहरांमध्ये अनेकांना शहरातील वापरासाठी ही निवडली. तसेच कमी किंमत व आपल्याकडे मोटारीचे सुख असावे, अशा दृष्टीनेही अनेक सामान्यांना ही कार आवडली. मुळात अल्टोसारखी कार मारुतीच्या ब्रॅँडनेममुळे जास्त लोकप्रिय झाली. उंच व्यक्तींना मात्र तशी अतिशय त्रासदायक ठरू शकेल, त्या तुलनेत फूटस्पेस नाही तसेच मागील आसनावर बसणारी व्यक्ती उंच असात कामाची नाही. साधारण ५ ते साडेपाच फुटांपर्यंत उंची असणाऱ्यांसाठी ही कार बऱ्यापैकी आरामदायी असू शकते.

छोटी असली तरीही लांबच्या प्रवासाला एक-दोन जणांना आरामदायी ठरू शकेल. मात्र जास्त माणसे बसल्यास व चालक काहीसा उंच असेल तर त्याच्यामागे बसणाऱ्या व्यक्तीला मग मात्र बसणे त्रासदायक होऊ शकते. तीन जणांच्या कुटुंबाला व अति उंच नसलेल्यांना अल्टो ८०० चालू शकते. छोटेखानी असल्याने एक मात्र चांगले आहे की, वाहतूक कोंडीतून निसटताना फार त्रास सहन करावा लागत नाही.

हेडलॅम्प पॉवरफूल असून रात्रीच्यावेळी समोरच्या वाहनाच्या लाईटचा प्रखर त्रास मात्र सहन करावा लागतो. कारण ही तशी बसकी असल्याने साहजिकच समोरच्या वाहनाचा प्रकाशझोत थेट डोळ्यावर येतो. सीएनजी इंधनामुळे मात्र कारने मिळवलेले मायलेज अनेकांना पसंत पडले व रफटफपणे वापरण्यासही त्यामुळे लोकांना आवडेल असेच हे अल्टो ८०० चे रुप आहे हे नक्की.तांत्रिक वैशिष्ट्येपेट्रोलइंजिन- ७९६ सीसी , ३ सिलिंडर,पेट्रोल, बीएस ४,कमाल ताकद - ३५.३ केडब्ल्यू @ ६०००आरपीएम / ३०.१ केडब्ल्यू @ ६०००आरपीएम (सीएनजी)कमाल टॉर्क - ६९ एनएम @ ३५०० आरपीएम /६० एनएम @ ३५०० आरपीएम (सीएनजी)गीयर्स - एकूण पाच. हाताने टाकण्याचे. केबल टाईप गीयर शिफ्ट सुविधालांबी, रुंदी व उंची (सर्व मिमि) - ३४३०/ १५१५/ १४७५व्हीलबेस - २३६०मीटर्निंग रेडियस - ४.६ मीग्राऊंड क्लीअरन्स - १६० मिमि.बूट स्पेस - --- ली.ब्रेक - फ्रंट व रेअर - डिस्क व ड्रमइंधन टाकी क्षमता - ३५ लीटर / सीएनजी ६० लीटर समतुल्यटायर व व्हील - १४५/8८०आर १२ स्टील रिम

टॅग्स :AutomobileवाहनMarutiमारुतीcarकार