Padma Awards 2025: मारुती ८०० च्या शिल्पकाराला मरणोत्तर पद्म विभूषण; सुझुकीच्या ओसामु सुझुकींचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 22:24 IST2025-01-25T22:24:03+5:302025-01-25T22:24:23+5:30
Padma Awards 2025: शारदा सिन्हा, ओसामु सुझुकी यांच्यासह ७ व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Padma Awards 2025: मारुती ८०० च्या शिल्पकाराला मरणोत्तर पद्म विभूषण; सुझुकीच्या ओसामु सुझुकींचा सन्मान
समस्त भारतीयांचे कारचे स्वप्न साकार करणाऱ्या सुझुकी मोटर्सचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांना भारत सरकारने पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याच व्यक्तीने मारुती ८०० ही सामान्यांची कार भारतात लाँच केली होती.
ओसामु सुझुकी यांचे गेल्या वर्षी २४ डिसेंबरला निधन झाले. त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे खरे नाव ओसामु मत्सुदा असे होते. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या संस्थापकांच्या नातीशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव बदलण्यात आले. पुढे तेच सुझुकीच्या साम्राज्याचे वारस ठरले. मारुतीसोबत त्यांनी भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले व पहिली सामान्यांना परवडणारी कार लाँच केली.
शारदा सिन्हा, ओसामु सुझुकी यांच्यासह ७ व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर पंकज उधास यांच्यासह १९ व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पद्मविभूषण...
- दुव्वुर नागेश्वर रेड्डी (वैद्यक)
- न्यायाधीश (निवृत्त) जगदीश सिंह खेहर (सार्वजनिक व्यवहार)
- कुमुदिनी रजनीकांत लाखिया (कला)
- लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कला)
- एम. टी. वासुदेवन नायर (साहित्य आणि शिक्षण) मरणोत्तर
- ओसामु सुझुकी (व्यवसाय आणि उद्योग) मरणोत्तर
- शारदा सिन्हा (कला) मरणोत्तर
पद्मभूषण...
- ए सूर्य प्रकाश (साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता)
- अनंत नाग (कला)
- बिबेक देबरॉय (मरणोत्तर) साहित्य आणि शिक्षण
- जतीन गोस्वामी (कला)
- जोस चाको पेरियाप्पुरम (औषध)
- कैलाशनाथ दीक्षित (इतर - पुरातत्व)
- मनोहर जोशी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार
- नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी (व्यापार आणि उद्योग)
- नंदमुरी बालकृष्ण (कला)
- पीआर श्रीजेश (क्रीडा)
- पंकज पटेल (व्यापार आणि उद्योग)
- पंकज उधास (मरणोत्तर) कला
- राम बहादूर राय (साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता)
- साध्वी ऋतंभरा (समाजकार्य)
- एस अजित कुमार (कला)
- शेखर कपूर (कला)
- सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) सार्वजनिक व्यवहार
- विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)