शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मोटारसायकलीच्या ब्रेक पेडलला रबरी कव्हर जरूर लावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:13 IST

मोटारसायकलीच्या ब्रेक पॅडलवर रबरी आवरण असणे हे अनेकदा उपयुक्त आहे. ओल्या पादत्राणामुळे त्यावरू पाय घसरू नये यासाठी ही दक्षता घेणे गरजेचे आहे.

सर्वसामान्यांच्या दृष्टीने मोटारसायकल ही नित्याचे दळणवळणाचे साधन झालेली आहे. अनेकदा छोट्या छोट्या बाबींकडे मात्र या मोटारसायकल वापरणाऱ्यांकडून दुलर्क्ष केले जाते व आयत्यावेळी काही तरी समस्या निर्माण झाल्यानंतर पंचाईत होते. इतकेच नव्हे तर काहीवेळा अपघातही होतो. मोटारसायकल वापरणाऱ्या काही लोकांशी चर्चा केल्यानंतर हा प्रकार आढळून जो, अतिशय मामुली वाटणारा असला तरी तितकाच महत्त्वाचा आहे. भारतात मोटारसायकलीला ब्रेक हा उजव्या बाजूला असतो. उजव्या पायाने हा ब्रेक दाबला जातो. मोटारसायकल कंपनीकडून या ब्रेकला अॅल्युमिनियम वा लोखंडाचे पेडल दिलेले असते. त्या पेडलला चौकोनी भाग टोकाला असतो, त्यामुळे तुम्हाला ब्रेक दाबताना त्रास होऊ नये. मोटारसायकलीला असणारे हे पेडल व त्याला असलेला हा चौकोनी आकाराचा पुढील भाग, त्यावर तुम्ही पाय दाबून ब्रेक कार्यान्वित करीत असता. मात्र कालांतराने या चौकोनी भागावर असणारे विशिष्ट प्रकारचे डिझाईन जे तो चौकोनी भाग तुमच्या पायाखालून सटकू नये म्हणून तयार केलेले असते, ते गुळगुळीत होते व ब्रेक दाबताना तुमच्या पायातील पादत्राण जर ओले झाले असेल तर ब्रेकवरून पाय सटकून ब्रेक लागत नाही किंवा जोराने झटका बसल्यासारखा लागू शकतो. मोटारसायकलीचा ब्रेक हा अतिशय महत्त्वाचा घटक असून जसा ब्रेक नीट आहे की नाही ते पाहाताना, त्याची वायर, लायनर वा डिस्कब्रेक असेल तर संलग्न बाबी तुम्ही मेकॅनिककडून तपासता व दुरूस्त करता तसेच ब्रेक पेडलवर रबर जरूर लावण्याचेही ध्यानात ठेवा. पावसाळ्यामध्ये विशेष करून पादत्राणाचे तळ ओले असताना पाय त्या ब्रेक पेडलवर ब्रेक दाबताना सरकू शकतो, त्यामुळे आवश्यक त्या पद्धतीने ब्रेक लावता येत नाही. त्यावेळी तुमचा पाय ब्रेकला सरावलेला असल्याने तो आपोआप स्वतः जुळवूनही घेत असतो. पण या प्रक्रियेत काही अडथळा आल्यास काही बारीक अपघातही घडू शकतो. अगदी त्याचप्रमाए पादत्राणांच्या तळाला पाणी लागल्यास, चिखल व शेण लागल्यासही पावसाळ्या व्यतिरिक्त ही स्थिती उद्भवू शकते.यासाठी ब्रेर पैडलच्या चौकोनी भागावर रबराचे आवरण जरूर लावून घ्या. काहीवेळा सुरुवातीला लावलेले हे आवरण निघूनही गेलेले असले तरी ते नियमितपणे निट आहे की नाही, ते पाहा. अनेकजण ब्रेक वापरासाठी पूर्ण पाय त्या पेडलवर ठेवत असतात, त्यांना ही समस्या जाणवतही नसेल. मात्र काहीजण पायाचा बोटांच्या भागाने पादत्राणाचा पुढचा टोकाचा भाग वापर करतात. अशावेळी पादत्राणाचा तळवा ओला असेल तर ही समस्या उद्भवू शकते. दिसायला ही अतिशय छोटी बाब असली तरी अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.

टॅग्स :Automobileवाहन