शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
3
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
4
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
5
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
6
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
7
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
9
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
10
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
11
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
12
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
13
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
14
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
15
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
16
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
17
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
18
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
19
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
20
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   

टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:35 IST

ही कार Mahindra XUV300 वर आधारित असेल, ज्यात एक शक्तिशाली बॅटरी असेल.

मुंबई - भारतातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी, महिंद्रा अँड महिंद्रा आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Mahindra XUV400 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ८ सप्टेंबर रोजी, महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकचे अनावरण केले जाणार आहे आणि त्यानंतर त्याच्या किंमतीसह महिंद्रा XUV400 मध्ये Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी काय खास आहे हे कळेल. 

ही कार Mahindra XUV300 वर आधारित असेल, ज्यात एक शक्तिशाली बॅटरी असेल. गेल्या काही दिवसांमध्ये, Mahindra XUV400 इलेक्ट्रिक बद्दल अनेक नवीन माहिती समोर आली आहे, त्यानुसार ती ४.२ मीटर लांब असेल आणि इलेक्ट्रिक सनरूफ देखील मिळेल. त्याच वेळी, लुक आणि डिझाइनच्या बाबतीत, याला XUV300 सारखेच हेडलॅम्प आणि बूमरॅंग आकाराचे एलईडी डीआरएल मिळतील. XUV300 पेक्षा चांगली केबिन स्पेससह, XUV400 ला नवीन डिझाइन केलेले 17-इंच अलॉय व्हील मिळतील. एकूणच, महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक SUV ला आधुनिक डिझाइन तसेच नवीन वैशिष्ट्यांचा कॉम्बो मिळेल.

मोठा बॅटरी पॅकआगामी महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकच्या संभाव्य बॅटरीबद्दल बोलाल तर एलजी कंपनीचा मोठा बॅटरी पॅक त्यात दिसू शकतो. ही इलेक्ट्रिक SUV ४५ kWh पर्यंतच्या बॅटरीद्वारे चालविली जाऊ शकते, ज्याची बॅटरी एका चार्जवर ४०० किमी पर्यंत रेंज असू शकते. त्याची इलेक्ट्रिक मोटर १५०bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्ट, वायरलेस चार्जिंग, रीअर एसी व्हेंट्स, मल्टिपल एअरबॅगसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमसह अनेक स्टँडर्ड  आणि सेफ्टी वैशिष्ट्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार Advanced Driving Assistant System (ADAS) आगामी Mahindra XUV400 मध्ये देखील दिसू शकते. 

टॅग्स :TataटाटाMahindraमहिंद्राelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर