Mahindra XUV700 ला 57 मिनिटांत मिळाल्या 25,000 बुकिंग; आनंद महिंद्रा म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 16:55 IST2021-10-07T16:45:00+5:302021-10-07T16:55:28+5:30
Mahindra XUV700 booking: कंपनीने कार लाँच करताना पहिल्या 25000 ग्राहकांना इंट्रोडक्टरी प्राईजमध्ये कार मिळणार असल्याची घोषणा केली होती. 25000 मध्ये ज्यांचा नंबर लागला त्यांना XUV700 ची एक्स शोरुम किंमत 11.99 लाख रुपयांना कार मिळणार आहे.

Mahindra XUV700 ला 57 मिनिटांत मिळाल्या 25,000 बुकिंग; आनंद महिंद्रा म्हणाले...
महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) ने आपली जबरदस्त एसयुव्ही Mahindra XUV700 ची बुकिंग सुरु केली आहे. कंपनीने याची घोषणा आधीच केली होती. कंपनीच्या दाव्यानुसार केवळ 57 मिनिटांत 25 हजार बुकिंग (Mahindra XUV700 booking) मिळाल्या आहेत. आनंद महिंद्रांनी देखील याचे ट्विट केले आहे.
कंपनीने कार लाँच करताना पहिल्या 25000 ग्राहकांना इंट्रोडक्टरी प्राईजमध्ये कार मिळणार असल्याची घोषणा केली होती. 25000 मध्ये ज्यांचा नंबर लागला त्यांना XUV700 ची एक्स शोरुम किंमत 11.99 लाख रुपयांना कार मिळणार आहे. यानंतरच्या ग्राहकांना 50000 रुपये जास्तीचे भरावे लागणार आहेत. डिझेल मॉडेलची सुरुवातीची किंमत 12.99 लाख रुपये झाली असून कंपनीने सर्वच मॉडेलमध्ये 50000 रुपयांची वाढ केली आहे.
यावर कंपनीचे मालक आनंद महिंद्रा म्हणाले, वेबसाईटवर तुफान प्रतिसाद मिळाल्याने बुकिंग प्रक्रिया धीमी झाली आहे. यावरून आम्हाला ग्राहकांचा आमच्यावर किती विश्वास आहे ते समजते. तसेच आमच्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे ते देखील समजले आहे.
Mahindra ने आपल्या आगामी SUV महिंद्रा XUV700 चे दोन नवीन व्हेरिएंट लाँच केले आहेत. हे व्हेरिएंट कंपनीने डिझेल इंजिन ऑप्शनसह लक्झरी सेगमेंटमध्ये आणले आहेत. कंपनीने डिझेल इंजिनमध्ये महिंद्रा XUV700 AX7 Luxury आणली आहे. हे महिंद्रा XUV700 चे 7-सीटर मॉडेल असणार आहे आणि कंपनीने ते मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोन्ही व्हेरिएंटमध्ये ऑफर केले आहे. त्याचे ऑटोमेटिक ट्रांसमिशन मॉडेल AWD (All Wheel Drive) सह येईल. महिंद्रा XUV700 च्या या मॉडेल्समध्ये AX7 च्या स्टँडर्ड फीचर्ससह फीचर्सचा एक लक्झरी पॅक मिळेल. जसे की यात सोनीचा 3D साउंड, इलेक्ट्रिकल डोअर हँडल, 360-डिग्री साराऊंड व्ह्यू, ड्रायव्हरसाठी गुडघ्याचे एअर बॅग आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग सारखी अनेक फीचर्स असतील.
कंपनीने गेल्याच आठवड्यात महिंद्रा XUV700 च्या विविध व्हेरिएंट आणि मॉडेल्सच्या किंमती जाहीर केल्या होत्या. आता डिझेल इंजिन महिंद्रा XUV700 AX7 Luxury MT आणि महिंद्रा XUV700 AX7 Luxury AT ची किंमत अनुक्रमे 19.99 लाख आणि 22.89 लाख रुपये असणार आहे.