शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

महिंद्रांनी फेकला हुकमी 'पत्ता'; XUV300 पेट्रोल AutoSHIFT लाँच, 40 हून अधिक कनेक्टेड फिचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 15:39 IST

Mahindra XUV300 launched : भारतातील तरुण कोणत्याही बाबतीत तडजोड करू इच्छित नाहीय. यामुळे ते तंत्रज्ञान युक्त सुविधांची मागणी करतात. पेट्रोलवर चालणारी ही एसयुव्ही सिटी आणि हायवेवर धावण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे ब्ल्यू सेन्स दिले आहे.

Mahindra & Mahindra (महिंद्रा अँड महिंद्रा) ने लोकप्रिय एक्सयुव्ही 300 चे  व्हर्जन ऑल न्यू पेट्रोल AutoSHIFT (ऑटोशिफ्ट) ट्रान्समिशन टेक्नॉलॉजीसोबत लाँच केले आहे. कंपनीने सांगितले की,  टॉपएंड व्हेरिअंट W8 (O) मध्ये ऑटोमॅटीक ट्रान्समिशनशिवाय ऑल-न्यू BlueSense Plus (ब्लूसेंस प्लस) कनेक्टेड टेक्नॉलॉजीदेखील देण्य़ात आली आहे. 

याचबरोबर नवीन पेट्रोल ऑटोशिफ्ट मॉडेलच्या बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर या कारची डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे. XUV300 मध्ये इलेक्ट्रिक सनरुफचे फिचर आता मधले व्हेरिअंट (W6) आणि यावरील मॅन्युअल व ऑटोशिफ्टच्या दोन्ही मॉडेलमध्येही देण्यात येणार आहे. कंपनीने ही कार नवीन कलर स्कीममध्ये लाँच केली आहे. W8(O) AutoSHIFT मध्ये डब्लू-टोन रेड डुअल-टोन एक्वामरीन रंग देण्यात आला आहे. W6, W8 आणि W8(O) मॅन्युअल व्हेरिअंटमध्ये ऑल-न्यू गॅलेक्सी ग्रे कलरचा पर्याय दिला आहे.

FASTag खरेदी करायचाय? जाणून घ्या मनातील समज गैरसमज...

40 हून अधिक कनेक्टेड फिचरXUV300 मध्ये ऑल-न्यू BlueSense Plus टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यामध्ये 40 हून अधिक फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये रिमोट डोअर लॉक, लाईव्ह व्हेईकल ट्रॅकिंग, सेफ्टी अँड सिक्युरिटी फिचर्स (यामध्ये जियो फेंसिंग, इमरजन्सी असिस्ट), व्हेईकल इन्फॉर्मेशन अलर्ट (यामध्ये पेट्रोल संपेल, टायर प्रेशर) सारखे जवळपास 40 फिचर्स देण्याच आले आहेत. हे तंत्रज्ञान अँड्रॉईड आणि आयओएसवर वापरता येणार आहे. 

थोडं थांबा! एक, दोन नाही...Royal Enfield च्या चार बुलेट येतायत...

किंमत भारतातील तरुण कोणत्याही बाबतीत तडजोड करू इच्छित नाहीय. यामुळे ते तंत्रज्ञान युक्त सुविधांची मागणी करतात. पेट्रोलवर चालणारी ही एसयुव्ही सिटी आणि हायवेवर धावण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे ब्ल्यू सेन्स दिले आहे. ज्यामुळे ग्राहक कारसोबत कनेक्ट राहतो. XUV300 मध्ये W6 पेट्रोल व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपयांपासून सुरु होते. ही कार सेफ्टीच्या बाबतीत टाटा, तंत्रज्ञानाच्या बाबतीत किया सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू, फोर्ड ईकोस्पोर्ट, मारुती ब्रेझाला टक्कर देणार आहे. 

MG Hector, Kia seltos विसराल; Citroen ची पहिली कार भारतात दाखल

फ्रान्सची मोठी वाहन निर्माता कंपनी सिट्रॉनने (Citroen) भारतात पाऊल ठेवले आहे. Citroen C5 Aircross ची झलक कंपनीने दाखविली असून लवकरच ही कार भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. PSA Groupe ची ही दणकट आणि आकर्षक एसयुव्ही आहे. या कारची खास बाब म्हणजे या कारमध्ये 90 टक्के पार्ट्स हे भारतात बनविण्यात आलेले आहेत. यामुळे याची किंमत कमी ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. 

Citroen ने नुकतीच La Maison concept वर आधारित १०शोरुम उघडण्याची घोषणा केली होती. कंपनीने पहिला शोरुम अहमदाबादमध्ये उघडला आहे. मार्चमध्ये मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, कोलकाता, चेन्नई आणि बंगळूरूमध्ये देखील शोरुम उघडण्यात येणार आहेत. ला मॅन्शन म्हणजे अपना घर असा अर्थ होतो. कंपनीची ही योजना आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. कंपनीने नुकतीच सिट्रोन सी ५ एअरक्रॉसची झलक दाखविली आहे. या एसयुव्हीचे उत्पादन कंपनीने तामिळनाडूच्या थिरुवेल्लूर प्लांटमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राTataटाटा