शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

आकर्षक लुक अन् दमदार इंजिन; महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लॉन्च; किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 8:11 PM

Mahindra XUV 3XO: महिंद्राने या नवीन सबकॉम्पॅक्ट SUV XUV 3XO चे 9 व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Mahindra XUV 3XO launched in India: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra ने आपली बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट SUV Mahindra XUV 3XO भारतीय बाजारपेठेत आज(29 एप्रिल 2024) रोजी विक्रीसाठी लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची किंमत फक्त 7.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. 

डिझाइन:कंपनीने या SUV ला स्पोर्टी लूक दिला आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला XUV400 इलेक्ट्रिकची आठवण येते. SUVचा समोरील भाग महिंद्राच्या 'BE' लाइन-अपपासून मोठ्या प्रमाणात प्रेरित असल्याचे दिसते. यात नव्यानेच डिझाइन केलेले ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, त्रिकोणी इन्सर्टसह नवीन ग्रिल सेक्शन आणि नवीन हेडलॅम्प मिळतात. एसयूव्हीचा मागील भागही पूर्णपणे नवीन पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. यात C-आकाराचा LED टेल लॅम्प आहे.

केबिन आणि फीचर्स:कंपनीने कारच्या केबिनला प्रीमियम टच दिला आहे. यात नवीन डिझाइन केलेले डॅशबोर्ड, एक मोठी 10.25'' इंफोटेनमेंट सिस्टम आणि सराउंड साउंड स्पीकर मिळतील. तसेच, या SUV मध्ये रिमोट क्लायमेट कंट्रोल फीचरदेखील दिले आहे, जे Adrenox ॲप वरून ऑपरेट होईल. म्हणजेच, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुनच कारच्या केबिनचे तापमान नियंत्रित करू शकाल. याशिवाय वायरलेस अॅपल कार प्ले/अँड्रॉइड ऑटो, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प यासारके फीचर्सही मिळतील.

पॉवर आणि परफॉर्मन्स:पॉवरट्रेनचा विचार केला तर ही SUV 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनसह बाजारात दाखल झाली आहे. कंपनीचा दावा आहे की ही SUV फक्त 4.5 सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग घेईल. कंपनीच्या दाव्यानुसार, Mahindra XUV 3XO च्या एंट्री लेव्हल वेरिएंटमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. मॅन्युअल वेरिएंट 18.89 किमी/लिटर पर्यंत मायलेज देईल, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 17.96 किमी/लिटर पर्यंत मायलेज देईल. याशिवाय, 1.5 लिटर डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. डिझेल मॅन्युअल व्हेरिएंट 20.6 किमी/लीटर पर्यंत मायलेज देईल, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 21.2 किमी/लीटर पर्यंत मायलेज देईल.

सुरक्षा:सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज, रिअर डिस्क ब्रेक, ESP आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. टॉप व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि ऑटो-होल्ड, हिल-स्टार्ट आणि हिल डिसेंट असिस्टसह लेव्हल 2 ADAS आहे.

Mahindra XUV 3XO व्हेरिएंट आणि किंमत:

  1. Mahindra XUV 3XO MX1 ची किंमत 7.49 लाख रुपये आहे.
  2. Mahindra XUV 3XO MX2 Pro MT ची किंमत 8.99 लाख रुपये आहे.
  3. Mahindra XUV 3XO MX2 Pro AT ची किंमत 9.99 लाख रुपये आहे.
  4. Mahindra XUV 3XO MX3 ची किंमत 9.49 लाख रुपये आहे.
  5. Mahindra XUV 3XO AX5 ची किंमत 10.69 लाख रुपये आहे.
  6. Mahindra XUV 3XO AX5L MT ची किंमत 11.99 लाख रुपये आहे.
  7. Mahindra XUV 3XO AX5L AT ची किंमत 13.49 लाख रुपये आहे.
  8. Mahindra XUV 3XO AX7 ची किंमत 12.49 लाख रुपये आहे.
  9. Mahindra XUV 3XO AX7L ची किंमत 13.99 लाख रुपये आहे. 
टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनauto expoऑटो एक्स्पो 2023carकार