शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्राने देशातील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारचे उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:00 IST

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते.

पर्यावरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने एकीकडे विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली असताना एक वाईट बातमी य़ेत आहे. भारतीय कंपनी महिंद्राने देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रीक कार e2o प्लसचे उत्पादनच थांबविले आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'बुलडोझर'ला मोठा धक्का बसला आहे. 

केंद्र सरकारने 2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नंतर केवळ इलेक्ट्रीक वाहनेच विकली जाणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याचे 'बुलडोझर'चे वक्तव्य त्यावेळी चर्चेत होते. या नंतर वाहन निर्मिती कंपन्यांनीसुद्धा त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फोक्सवॅगन आणि आता मारुतीने डिझेलची वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

महिंद्राने या छोट्याशा दोन दरवाजांच्या e2o या कारचे उत्पादन 2013 मध्ये सुरु केले होते. तर ऑक्टोबर 2016 मध्ये या कारला चार दरवाजे देण्यात आले होते आणि  e2o प्लस असे नाव दिले होते. या कारचे उत्पादन 31 मार्चपासून झालेले नाही. 

महिंद्रा या कारचे उत्पादन कर्नाटकमध्ये करत होती. कंपनीने या कारचे चार व्हेरिअंट लाँच केले होते. या कारचे पी8 हे व्हेरिअंट एका चार्जिंगमध्ये 140 किमी जात होते. तर अन्य व्हेरिअंट 110 किमी धावत होते. कंपनीने गेल्यावर्षीच P2 आणि  P8 व्हेरिअंट बंद केले होते. आता त्यांच्याकडे केवळ दोनच मॉडेल आहेत.

फुल चार्जसाठी दीड तास लागायचा e2o च्या P2 व्हेरिअंटमध्ये  3kW सिंगल फेज 16 अँपिअरचा चार्जर येत होता. ही कार चार्ज होण्यासाठी 7.20 तास लागत होते. तर 32 अँपिअरच्या चार्जरद्वारे 1.35 तासांत फुल चार्ज होत होती. या कारमध्ये लिथिअम आयनची बॅटरी वापरली होती. या कारवर तीन वर्षांची किंवा 60 हजार किमीची वॉरंटी दिली जात होती. ही कार बंद झालेली असली तरीही त्याच्याजागी e-KUV100 ही नवीन इलेक्ट्रीक कार आणली जाण्याची शक्यता आहे. ही कार दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच केली जाईल. तसेच XUV300 चीही इलेक्ट्रीक कार येण्याची शक्यता आहे. या कारमध्ये दोन बॅटरी दिल्या जातील. 

 

टॅग्स :Mahindraमहिंद्राElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन