शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या
2
फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 
3
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
4
"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही"
5
T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी
6
इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
7
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
8
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
9
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
10
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
11
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
12
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
13
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
14
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
15
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
16
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
17
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
18
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
19
NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
20
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

एकही रुपया न भरता Mahindra Scorpio-N खरेदी करण्याची संधी; 'ही' आहे शानदार स्कीम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 6:02 PM

Scorpio-N : महिंद्राने आपल्या वित्त भागीदारांसह नवीन स्कॉर्पिओ-एन साठी FinN पॅकेज अंतर्गत एक आकर्षक फायनान्स स्कीम जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : महिंद्राने अलीकडेच भारतात बहुप्रतिक्षित Scorpio-N SUV लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये, एक्स-शोरूम आहे. मात्र, ही किंमत सुरुवातीच्या 25 हजार बुकिंगसाठी आहे. त्यानंतरच्या बुकिंगच्या किमती अजून जाहीर केलेल्या नाहीत. यानंतर बुकिंग 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुरू झाले. यासह एसयूव्हीने नवा विक्रम केला आहे. 30 मिनिटांत 1,00,000 बुकिंग झाले. एवढेच नाही तर पहिल्याच मिनिटात 25 हजार बुकिंग झाले. पण, कमी बजेटमुळे तुम्ही अजून बुक केले नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनी स्कॉर्पिओ-एनसाठी एक आकर्षक फायनान्स स्कीम घेऊन आली आहे.

महिंद्राने आपल्या वित्त भागीदारांसह नवीन स्कॉर्पिओ-एन साठी FinN पॅकेज अंतर्गत एक आकर्षक फायनान्स स्कीम जाहीर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या फायनान्स स्कीम FinN अंतर्गत, ग्राहकांना 6.99 टक्के सुरुवातीच्या व्याजदराने फायनान्स केला जाईल. कर्जाचा कालावधी कमाल 10 वर्षांपर्यंत असू शकतो. महिंद्राने ऑफर केलेल्या फायनान्स स्कीमअंतर्गत, ग्राहकांना कारच्या ऑन-रोड किमतीवर 100 टक्केपर्यंत फायनान्स केले जाऊ शकते. म्हणजेच, कारच्या एक्स-शोरूम किंमतीव्यतिरिक्त, नोंदणी खर्च, विमा, अॅक्सेसरीज, शील्ड, एएमसी आणि लोन प्रोटेक्शनसाठी देखील निधी दिला जाऊ शकतो.

दुसर्‍या पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत, तुम्हाला फक्त बुकिंग करावे लागेल. त्याची बुकिंग रक्कम 21 हजार रुपये आहे. तुम्ही आत्ताच कार बुक करू शकता आणि नंतर फायनान्सची प्रक्रिया सुरू करू शकता. जर तुम्हाला ऑन रोड किंमतीवर 100 टक्के फायनान्स मिळाला तर तुम्हाला हे पैसे परत मिळतील. विशेष म्हणजे, क्रेडिट किंवा कर्ज फायनान्सरच्या स्वतःच्या अटी व शर्तींच्या अधीन असेल. सर्व-नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची किंमत सध्या 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.90 लाख रुपयांपर्यंत जाते.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहन