भारतीय वाहन उद्योगासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२५ मध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे. विशेषतः एसयूव्ही (SUV) आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वाढत्या मागणीमुळे या कंपन्यांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने डिसेंबर २०२५ मध्ये एकूण २,१७,८५४ युनिट्सची विक्री केली आहे. यामध्ये १८२,१६५ युनिट्सची देशांतर्गत विक्री ही कंपनीसाठी आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. २०२५ या संपूर्ण कॅलेंडर वर्षात कंपनीने २३.५ लाखांहून अधिक वाहने विकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. मारुतीकडे अजून १.७५ लाख बुकिंग वेटिंगवर आहेत.
वर्ष संपता संपता महिंद्राने टाटाला धोबीपछाड दिला आहे. केवळ एसयुव्हीचाच ताफा असणाऱ्या या कंपनीने टाटाला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिंद्राने आपल्या दमदार SUV पोर्टफोलिओच्या जोरावर डिसेंबरमध्ये २५% वाढ नोंदवली. कंपनीने एकूण ८६,०९० वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये एकट्या SUV विभागाचा वाटा ५०,९४६ युनिट्स इतका होता. ग्रामीण भागातील मागणी आणि नवीन मॉडेल्सना मिळालेला प्रतिसाद यामुळे महिंद्राची घोडदौड सुरूच आहे.
टाटा मोटर्सने डिसेंबरमध्ये ५०,५१९ युनिट्ससह १४% वार्षिक वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत २४% वाढ झाली असून ६,९०६ EV युनिट्सची विक्री झाली आहे. टाटाच्या नेक्सॉन आणि नवनवीन लाँच झालेल्या सिएरा एसयूव्हीला ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.
मारुती सुझुकीचे वर्चस्व आणि टाटा मोटर्स-महिंद्रा अँड महिंद्रा यांच्याकडून मिळणारी तगडी स्पर्धा यामुळे ह्युंदाईसाठी गेल्या काही महिन्यांचा काळ 'रफ पॅच' ठरला आहे. ह्युंदाईला 42,416 एवढ्याच कार विक्री करण्यात यश आले आहे. टोयोटाने पाचवा क्रमांक पटकावला आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले पाचवे स्थान मजबूत करत ३४,१५७ युनिट्सची देशांतर्गत विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या (डिसेंबर २०२४) तुलनेत कंपनीने ३७% इतकी प्रचंड वाढ नोंदवली आहे.
किया इंडियाने १८,६५९ युनिट्स, JSW एमजी मोटर इंडियाने डिसेंबरमध्ये ६,५०० युनिट्सची, तर पूर्ण वर्षात ७०,५५४ युनिट्सची विक्री केली. कंपनीच्या 'एमजी सिलेक्ट' या प्रीमियम चॅनेलने ३८% मासिक वाढ नोंदवली. यामध्ये M9 प्रेसिडेन्शियल लिमोझिन आणि सायबरस्टर (Cyberster) या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारचा मोठा वाटा आहे. एवढेच नाही तर एमजीने भारतात १ लाख इलेक्ट्रिक वाहने (EV) विकण्याचा ऐतिहासिक टप्पाही याच वर्षी ओलांडला आहे.
रेनो इंडियाने डिसेंबरमध्ये ३,८४५ युनिट्सची विक्री नोंदविली आहे. होंडा कार्स इंडियाने ५,८०७ युनिट्सची विक्री केली आहे.
Web Summary : In December 2025, Maruti Suzuki led car sales, but Mahindra overtook Tata. Mahindra recorded 25% growth, driven by SUV demand. Tata's EV sales rose 24%. Kia and MG also performed well, with MG surpassing 1 lakh EV sales in India.
Web Summary : दिसंबर 2025 में मारुति सुजुकी कार बिक्री में आगे रही, लेकिन महिंद्रा ने टाटा को पीछे छोड़ दिया। एसयूवी की मांग से महिंद्रा की बिक्री में 25% की वृद्धि हुई। टाटा की ईवी बिक्री 24% बढ़ी। किआ और एमजी ने भी अच्छा प्रदर्शन किया, एमजी ने भारत में 1 लाख ईवी बिक्री का आंकड़ा पार किया।