Mahindra: महिंद्राच्या या वाहनांच्या फ्युअल पाईपमध्ये मोठा दोष; तब्बल 30000 गाड्या मागे बोलावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:57 PM2021-08-10T17:57:44+5:302021-08-10T17:58:17+5:30

Mahindra recall: फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपली थार एसयुव्हीच्या डिझेल व्हेरिअंटला रिकॉल केले होते. १५७७ युनिट्स माघारी बोलविण्यात आले होते. या वाहनांच्या इंजिनच्या भागात सदोष कॅमशेफ्ट लावला गेला होता. तो बदलण्यात आला.

Mahindra company recalls 29,878 pick up vehicles to replace faulty fluid pipe | Mahindra: महिंद्राच्या या वाहनांच्या फ्युअल पाईपमध्ये मोठा दोष; तब्बल 30000 गाड्या मागे बोलावल्या

Mahindra: महिंद्राच्या या वाहनांच्या फ्युअल पाईपमध्ये मोठा दोष; तब्बल 30000 गाड्या मागे बोलावल्या

Next

एसयुव्ही, माल वाहतुकीच्या छोट्या गाड्यांची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Mahindra and Mahindra (महिंद्रा अँड महिंद्रा) ने मंगळवारी खराब असेम्ब्लीच्या शंकेमुळे फ्ल्यूअल पाईप बदलण्यासाठी आपली पिकअप वाहने रिकॉल केली आहेत. येत्या काळात 29,878 वाहने माघारी बोलावण्यात आली आहेत. (Mahindra to recall nearly 30,000 pickup trucks due to fluid pipe issue.)

दिल बडा होना चाहिए! एथरने दुसऱ्या कंपन्यांच्या इ-स्कूटरसाठी फास्ट चार्जरचा पेटंटच खुला केला

महिंद्राने म्हटले की, कंपनीने असेंब्लीमध्ये शंका असल्याने जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2020 मध्ये बनविण्यात आलेल्या काही पिकअप गाड्यांच्या फ्युएल पाईपचे निरीक्षण करण्यासाठी आणि बदलण्यासाठी माघारी बोलविल्या आहेत. 

Video: आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय! कंपनीची वर्षानुवर्षाची ओळख 'पुसणार'; लोगो बदलणार

निरीक्षण आणि दुरुस्ती मोफत केली जाणार आहे. या गाड्यांच्या मालकांना डीलरशिपकडून व्यक्तीगतरित्या फोन केले जातील. आपल्या ग्राहकांसाठी त्रासमुक्त अनुभव देण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या प्रमुखांनी सांगितले. 

Anand Mahindra टेन्शनमध्ये; प्रिमियम एसयुव्ही XUV700 लाँचिंगआधीच झाली ट्रोल, लोकांना नापसंद

गेल्या महिन्यात कंपनीने नाशिकच्या फॅक्टरीमध्ये बनलेल्या काही वाहनांच्या डिझेल इंजिनांचे सक्रीय निरीक्षण आणि बदलण्याची घोषणा केली होती. फॅक्टरीतील दुषित इंधनामुळे स्पेअर पार्ट लवकर खराब होण्याची शक्यता होती. कंपनीने केलेला हा रिकॉल 21 जून आणि 2 जुलै 2021 दरम्यान बनलेल्या 600 वाहनांसाठी होता. 
तर फेब्रुवारीमध्ये कंपनीने आपली थार एसयुव्हीच्या डिझेल व्हेरिअंटला रिकॉल केले होते. १५७७ युनिट्स माघारी बोलविण्यात आले होते. या वाहनांच्या इंजिनच्या भागात सदोष कॅमशेफ्ट लावला गेला होता. तो बदलण्यात आला.

Web Title: Mahindra company recalls 29,878 pick up vehicles to replace faulty fluid pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.