मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:51 IST2025-09-20T13:50:48+5:302025-09-20T13:51:04+5:30

Mahindra car price cut after GST in Marathi: महिंद्राने जीएसटी दर कपातीचा फायदा ग्राहकांना दिला असून, Bolero, Thar, Scorpio, XUV 700 सह अनेक गाड्यांच्या किमतीत मोठी घट जाहीर केली आहे. नवीन दर आणि किमती जाणून घ्या.

Mahindra car price cut Marathi: After Maruti, Mahindra's GST rates have come...! XUV 700 is cheaper than Scorpio N, Bolero Neo is... | मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

देशभरात लागू झालेल्या नवीन जीएसटी दरांमुळे वाहन उद्योगातही मोठे बदल झाले असून, याचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेत महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या SUV गाड्यांच्या किमतीत मोठी घट जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ICE (Internal Combustion Engine) सेगमेंटमधील सर्व SUV गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. या किमतीतील कपात १.०१ लाख रुपयांपासून १.५६ लाख रुपयांपर्यंत आहे.

कोणत्या गाडीची किंमत किती कमी झाली?

बोलेरो/बोलेरो निओ: एकूण बचत ₹२.५६ लाखांपर्यंत (जीएसटी कपात ₹१.२७ लाख + अतिरिक्त लाभ ₹१.२९ लाख).

XUV 3XO: एकूण बचत ₹२.४६ लाखांपर्यंत (जीएसटी कपात ₹१.५६ लाख + अतिरिक्त लाभ ₹९०,०००).

थार: एकूण बचत ₹१.५५ लाखांपर्यंत (जीएसटी कपात ₹१.३५ लाख + अतिरिक्त लाभ ₹२०,०००).

स्कॉर्पिओ क्लासिक: एकूण बचत ₹१.९६ लाखांपर्यंत (जीएसटी कपात ₹१.०१ लाख + अतिरिक्त लाभ ₹९५,०००).

स्कॉर्पिओ-एन: एकूण बचत ₹२.१५ लाखांपर्यंत (जीएसटी कपात ₹१.४५ लाख + अतिरिक्त लाभ ₹७१,०००).

थार रॉक्स: एकूण बचत ₹१.५३ लाखांपर्यंत (जीएसटी कपात ₹१.३३ लाख + अतिरिक्त लाभ ₹२०,०००).

XUV 700: एकूण बचत ₹२.२४ लाखांपर्यंत (जीएसटी कपात ₹१.४३ लाख + अतिरिक्त लाभ ₹८१,०००).

स्कॉर्पिओ एनपेक्षा एक्सयुव्ही ७०० कमी झाली...
XUV 3XO ची नवीन किंमत 7.28 लाख रुपयांपासून सुरू होईल, महिंद्रा बोलेरो आणि निओ 8.79 लाख रुपयांपासून सुरू होईल, थार 10.32 लाख रुपयांपासून सुरू होईल, स्कॉर्पिओ क्लासिक 12.98 लाख रुपयांपासून सुरू होईल, स्कॉर्पिओ N 13.20 लाख रुपयांपासून सुरू होईल, थार रॉक 12.25 लाख रुपयांपासून सुरू होईल आणि XUV 700 ची किंमत 13.19 लाख रुपयांपासून सुरू होईल.

Web Title: Mahindra car price cut Marathi: After Maruti, Mahindra's GST rates have come...! XUV 700 is cheaper than Scorpio N, Bolero Neo is...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.