शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kia Sonet चं 7 सीटर व्हेरिअंट होणार लाँच; पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 15:04 IST

Kia Motors : पाहा कशी आहे कार आणि कोणते आहेत जबरदस्त सेफ्टी फीचर्स

ठळक मुद्देकारमध्ये देण्यात आले आहेत जबरदस्त सेफ्टी फीचर्सलवकरच भारतात लाँच होणार

दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Kia Motors नं अलीकडेच भारतीय बाजारात पाऊल ठेवलं आहे. परंतु अत्यंत कमी कालावधीत ही कंपनी अतिशय लोकप्रिय झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने आपली परवडणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही किआ सोनेट भारतीय बाजारात बाजारात लाँच केली होती. आता कंपनी त्या कारचं 7- सीटर व्हर्जन बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

पण भारतात लाँच करण्यापूर्वी कंपनीनं इंडोनेशियातील बाजारपेठेत ही कार लाँच केली आहे. जगातील हा पहिला देश आहे जिथे हे मॉडेल लाँच केलं गेलं आहे. लवकरच ती भारतीय बाजारातही आणली लाँच केली जाईल. भारतीय बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या 5 सीटर कारच्या तुलनेत यात अधिक फरक नसला तरी यामध्ये मागील बाजूला आणखी दोन अतिरिक्त सीट्स देण्यात आल्या आहेत. 

कशी आहे ही कार ?कंपनीनं या नव्या मॉडेलमध्ये सनरूफ काढून टाकला आहे. जेणेकरून सर्वात मागील बाजूला बसलेल्या प्रवाशांनाही एसीचं कुलिंग अनुभवता येईल. मध्यभागी असलेल्या सीटच्या हेडरेस्डमध्ये एसी व्हेंट देण्यात आले आहे. याशिवाय दुसऱ्या रो मधील सीट्स प्रवाशांना रिक्लाईनदेखील करता येणार आहेत. कंपनीनं सोनेटच्या या नव्या व्हर्जनला इंडोनेशियन बाजारात Premiere 7  असं नाव दिलं आहे. या  कारमध्ये कनेक्टिव्हीटी फीचर्स म्हणून ब्लूटूथ, व्हॉईस रेकग्नायझेशन आणि युएसबी दिले आहेत.  

जबरदस्त सेफ्टी फीचर्ससुरक्षेसाठीही कंपनीनं अनेक फीचर्स दिले आहेत. यामध्ये एबीएस, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन. ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, इमरजन्सी स्टॉप सिग्नल, रिअर कॅमेरा, डायनॅमिक पार्किंग गाईड, रिमोट इंजिन स्टार्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखे फीचर्स दिले आहेत.

इंजिन आणि किंमतया कारमध्ये कंपनीनं 1.5 लिटर क्षमतेचं स्मार्टस्क्रिन ड्युअल CVVT इंजिन दिलं आहे. जे 115PS पॉवर आणि 144Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. तसंच ही कार सहा रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये क्लियर व्हाइट, इंटिलिजन्स ब्लू, इंटेंस रेड, स्टील सिल्वर, ऑरोरा ब्लॅक पर्ल आणि बिज गोल्ड या रंगांचा समावेश आहे. इडोनेशियन बाजारात या काची किंमत 199,500,000 (इंडोनेशियन रूपया) 

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सcarकारIndiaभारतIndonesiaइंडोनेशिया