शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल चार्जवर TVS iQube ची रेंज 145 किमी , 24 पेक्षा अधिक मिळतील फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:27 IST

इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooters) सध्याच्या रेंजमध्ये आपण  टीव्हीएस आयक्युब (TVS iQube) इलेक्ट्रिक बद्दल जाणून घेऊया. ही एक हाय-टेक फीचर्स आणि लांब रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू व्हीलर सेक्टरमध्ये स्कूटर आणि बाइक्सची मोठी रेंज पाहायला मिळते. कमी बजेटच्या बेसिक इलेक्ट्रिक स्कूटरपासून ते जास्त रेंजच्या प्रीमियम स्कूटर्सपर्यंत... इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooters) सध्याच्या रेंजमध्ये आपण  टीव्हीएस आयक्युब (TVS iQube) इलेक्ट्रिक बद्दल जाणून घेऊया. ही एक हाय-टेक फीचर्स आणि लांब रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

TVS iQube Electric Priceटीव्हीएस मोटर्सने (TVS Motors) आत्तापर्यंत iQube इलेक्ट्रिकचे दोन व्हेरिएंट बाजारात लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये पहिला व्हेरिएंट स्टँडर्ड आहे ज्याची किंमत आहे 1,61,056 रुपये आणि दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत आहे 1,60,976 रुपये आहे. या दोन्ही किंमती (एक्स-शोरूम, दिल्ली) आहेत. कंपनी लवकरच  iQube इलेक्ट्रिकचे स्वस्त व्हर्जन  TVS iQube Electric ST लाँच करणार आहे.

TVS iQube Electric Battery and MotoriQube इलेक्ट्रिकमध्ये देण्यात असलेला बॅटरी पॅक हा 4.56 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक असून त्यात 4400 W पॉवर BLDC मोटर आहे. कंपनीच्या मते, या बॅटरी पॅकला 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 4 तास आणि 6 मिनिटे लागतात. TVS ने या स्कूटरसोबत फास्ट चार्जिंगचा ऑप्शन देखील दिला आहे, ज्यामध्ये बॅटरी बॅक 2 तास 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते.

TVS iQube Electric Range and Top Speedटीव्हीएस कंपनीच्या मते iQube इलेक्ट्रिक एका चार्जवर 145 किमीची रेंज ऑफर करते आणि या रेंजसह कंपनी 82 किमी प्रतितासच्या टॉप स्पीडचा दावा करते. या स्कूटरमध्ये कंपनीने दोन राइडिंग मोडचा (इको, स्पोर्ट) पर्याय दिला आहे.

TVS iQube Electric Braking and Suspensionब्रेकिंग सिस्टममध्ये कंपनीने स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचा पर्याय दिला आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला अॅडजस्टेबल हायड्रॉलिक ट्विन ट्यूब शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन सिस्टीम देण्यात आली आहे.

TVS iQube Electric FeaturesTVS iQube मधील फीचर्सबद्दल सांगायचे तर पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, नेव्हिगेशन, कॉल, एसएमएस अलर्ट, जिओ फेन्सिंग, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, म्युझिक कंट्रोल, ओटीए, एक्सटर्नल स्पीकर, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटरसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. या फीचर्सशिवाय, या स्कूटरमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, नंबर प्लेट लॅम्प, पार्किंग असिस्ट, लाइव्ह लोकेशन स्टेटस, क्रॅश अँड फॉल अलर्ट, जीएसएम कनेक्टिव्हिटी, पार्किंग ब्रेक लीव्हर, डॉक्युमेंट स्टोरेज यांसारखे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड