LMOTY 2020: पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:11 PM2021-03-16T14:11:20+5:302021-03-16T14:13:15+5:30

Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020: इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

lmoty 2020 Nitin Gadkari two years the price of electric vehicles will be equal to petrol vehicles | LMOTY 2020: पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरी

LMOTY 2020: पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरी

Next

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी व्हावा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे प्रयत्न सुरू आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीनं गडकरी प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात लोकमतच्या 'महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२०' (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) सोहळ्यात गडकरींनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. (Nitin Gadkari on electric vehicle price)

सचिन वाझेप्रकरणी तपास नीट व्हावा; नितीन गडकरींनी व्यक्त केली मोठी अपेक्षा

पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांइतक्याच असतील, असं गडकरींनी सांगितलं. सध्या जिथे ५० हजार रुपयांचं इंधन लागतं, त्याच ठिकाणी अवघ्या २ हजारांची वीज लागेल, असं ते पुढे म्हणाले. एका चार्जमध्ये दिल्लीहून बलियाला जाऊन परतणारी इलेक्ट्रिक बस आणि कार तयार करू, असा दावादेखील त्यांनी केला.

१ एप्रिल २०२२ पासून 'या' गाड्या निघणार भंगारात; लवकरच येणार नियम

देशभरात ७.८९ लाख कोटी रुपयांच्या महामार्गांची कामं सुरू असल्याचं गडकरींनी सांगितलं. 'कोरोनामुळे महामार्गाचं काम रेंगाळलं आहे. मात्र आता ही कामं वेगानं पूर्ण करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. देशात सध्या २ हजार ४८ प्रकल्पांची कामं सुरू आहेत. या प्रकल्पांच्या अंतर्गत ६५ हजार ५२३ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग येतात,' अशी आकडेवारी गडकरींनी सांगितली.

महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं व्यवस्थितपणे पालन होत नसल्याचं गडकरी म्हणाले. 'सर्वांना कोरोनाची लस मिळेल. मात्र जोपर्यंत सर्वांना कोरोना लस मिळत नाही, तोपर्यंत काळजी घ्यायला हवी. प्रशासनाला सहकार्य करायला हवं,' असं आवाहन त्यांनी केलं.

Web Title: lmoty 2020 Nitin Gadkari two years the price of electric vehicles will be equal to petrol vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.