रेनॉकडून 'एक्‍स्‍पीरिअन्‍स डेज' लाँच; राज्यात ३१ ठिकाणी असणार फिरता शोरुम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 01:12 PM2023-08-22T13:12:52+5:302023-08-22T13:14:35+5:30

रेनॉ शोरुमसारखीच सुविधा इथेही देणार आहे. यावेळी ग्राहकांना कारची माहिती देण्यासाठी कर्मचारी असणार आहेत.

Launch of 'Experience Days' by Renault; There will be mobile showrooms at 31 locations in Maharashtra | रेनॉकडून 'एक्‍स्‍पीरिअन्‍स डेज' लाँच; राज्यात ३१ ठिकाणी असणार फिरता शोरुम

रेनॉकडून 'एक्‍स्‍पीरिअन्‍स डेज' लाँच; राज्यात ३१ ठिकाणी असणार फिरता शोरुम

googlenewsNext

मुंबई : रेनॉ इंडिया या युरोपियन कार ब्रॅण्‍डने देशभरासह महाराष्‍ट्रातही 'रेनॉ एक्‍स्‍पेरिअन्‍स डेज'ची घोषणा केली आहे. याद्वारे राज्यात 'शोरूम ऑन व्हील्‍स' उपक्रम ३१ ठिकाणी राबविण्यात येणार आहे. 

Renault Kiger Review: रेनॉ कायगर अन् १८०० किमींचा प्रवास, गावखेडी, कोकणातले नागमोडी घाट, रस्ते.... कशी वाटली?

शोरूम ऑन व्‍हील्‍स, वर्कशॉप ऑन व्हील्स याद्वारे रेनॉ ग्राहकांना सर्विसिंग, ऑन स्‍पॉट टेस्‍ट ड्राइव्‍ह, बुकिंग व कार फायनान्सचा पर्याय दिला होता. याच सुविधा आताही मिळणार आहेत. रेनॉ ही फ्रान्सची कंपनी आहे, तिथे या कंपनीच्या कारची विक्री होतेच शिवाय युरोपमध्येही ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

रेनॉ शोरुमसारखीच सुविधा इथेही देणार आहे. यावेळी ग्राहकांना कारची माहिती देण्यासाठी कर्मचारी असणार आहेत. तसेच कोणती कार घ्यावी, यासाठीही मार्गदर्शन करणार आहेत. 

रेनॉच्या ताफ्यात सात सीटर सर्वात स्वस्त कार ट्रायबर, स्पोर्टी लुक असलेली कायगर आणि कंपनीची सर्वाधिक खप असलेली क्विड या कार आहेत. ट्रायबरमध्ये तर ६२५ लीटरचे बुटस्पेस आहे. तसेच ग्लोबल एनकॅपने फोर स्टार रेटिंगही दिलेली आहे. रेनोने देशभरात ४५० हून अधिक शोरुम व ५०० हून अधिक सर्व्हिस सेंटर उघडली आहेत. सर्व्हिस सेंटरमध्ये २३० वर्कशॉप ऑन व्‍हील्‍सचा समावेश आहे. 

Web Title: Launch of 'Experience Days' by Renault; There will be mobile showrooms at 31 locations in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.