शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

हार्ले डेव्हिडसनच्या स्ट्रीट बॉब, फॅट बॉब व फॅट बॉय या तीन तरुण पिढीच्या बाइक्सचे लाँचिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 11:46 IST

हार्ले डेव्हिडसनच्या तीन नव्या मोटारसायकली लाँच होत आहेत, हीच तरुणांच्या आकर्षणाची बाब आहे. ११५ व्या वर्धापनवर्षानिमित्त एकंदर ८ मॉडेल्स सादर केली जाणार आहेत

ठळक मुद्देयामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बदल असून तो हॅण्डलबारमध्ये केला गेला आहेपूर्वी इंधन टाकीवर असणारे हे युनिट क्लस्टर आता दुसऱ्या जागी येत आहेनवीन मफलर आरेखन व रंगातील एक खास राकटपणा या मोटारसायकलीचे वैशिष्ट्य

हार्ले डेव्हिडसन ची बाईक ही अनेक तरुणांचे स्वप्न असते. महाग पण एक आगळी जोमदार,तडफदार अशी ही मोटारसायकल हे तरुणांचे आकर्षण, हार्ले डेव्हिडसनच्या ११५ व्या वर्धापनवर्षानिमित्त त्यांनी २०१८च्या मालिकेतील तीन बाइक्स भारतात १२ ऑक्टोबरला सादर करण्य़ाचे ठरवले आहे. तसे पाहायला गेले तर हार्ले डेव्हिडसन इंडियाने जगभरातील तरुणाईच्या मानल्या गेलेल्या मोटारबाइक्सचे सादरीकरण या आधीच केले आहे. पण आता याच महिन्यात या नव्या तीन बाइक ऑक्टोबर हीट ठरणार आहेत. स्ट्रीट बॉब, फॅट बॉब व फॅट बॉय या तीन दमदार मोटारसायकल सादर होणार आहेत. २०१८मधील मालिकेतील या मोटारसायकलींपैकी या तीन मोटारसायकली काही छोट्या बदलांद्वारे भारतात सादर होत आहे. काही मॉडेल्समध्ये मात्र महत्त्वाचे बदलही केले जाणार आहेत. ते या तीन मॉडेल्समध्ये आहेत की, पुढील वर्षी सादर होणाऱ्या मॉडेलमध्ये असतील ते पाहायचे आहे.या वर्धापनवर्षामध्ये एकंदर ८ मोटारसायकली हार्ले डेव्हिडसन सादर करणार असून

स्ट्रीट बॉब, फॅट बॉब व फॅट बॉय मधील वैशिष्ट्ये

हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट बॉब - यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बदल असून तो हॅण्डलबारमध्ये केला गेला आहे. पूर्वी इंधन टाकीवर असणारे हे युनिट क्लस्टर आता दुसऱ्या जागी येत आहे. नवीन मफलर आरेखन व रंगातील एक खास राकटपणा या मोटारसायकलीचे वैशिष्ट्य असणार आहे.

हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब - फॅट या शब्दात एक जाडेपणा असला तरी या मोटारसायकलीत केवळ जाडेपणा नाही तर आक्रमकता असणारे आरेखन आहे. तसा एक रांगडा लूक त्याला दिला गेला आहे. हेडलॅम्पचे लंबवर्तुळाकार रूप होते. ते आता अिधक वेगळ्या रितीने बसवण्यात आले आहे. मफलरही नव्या लूकचा आहे.

हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय - अमेरिकी भाषेत 'स्टीमरोलर'चा पवित्रा असणारी ही मोटरसायकल फॅन्सी रिम दिलेली असून सॉफ्टेल फ्रेम अधिक हलकी पण कणखर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

हार्ले डेव्हिडसन ११५ व्या वर्षात सादर होणाऱ्या आठवही मोटारसायकलींना स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची स्वतःची अशी विविध वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा प्रत्येकाचा एक लूक वा attitude आहे.

हार्ले डेव्हिडसनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू एस. लेव्हातिच म्हणतात संपूर्ण नव्या पिढीला प्रोत्साहीत करणारी ही आठ मॉडेल्स आहेत.

फॅट बॉय, हेरिटेज क्लासीक, लोअर रायडर, सॉफ्टेल स्लीम, डिलक्स, ब्रेकआऊट, फॅट बॉब व स्ट्रीट बॉब अशा आठ नावांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हा मोटारसायकली असतील.

२९६ किलोग्रॅम वजन, शक्तीमान असे १७४५ सीसीचे मिलवाऊकी-एट -१०७ असे मोठे ट्वीन इंजिन,

टॅग्स :Harley-Davidsonहार्ले डेव्हिडसनtwo wheelerटू व्हीलरAutomobileवाहन