Land Rover Defender: ८ सीटर दमदार ऑफरोडर SUV लॉन्च, जबरदस्त फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 11:00 IST2023-03-01T10:57:23+5:302023-03-01T11:00:48+5:30
लँड रोवरनं भारतीय बाजारात आपली नवी एसयूव्ही Defender 130 लॉन्च केली आहे.

Land Rover Defender: ८ सीटर दमदार ऑफरोडर SUV लॉन्च, जबरदस्त फिचर्स अन् किंमत किती? जाणून घ्या...
नवी दिल्ली-
लँड रोवरनं भारतीय बाजारात आपली नवी एसयूव्ही Defender 130 लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजीन क्षमतेसह ही एसयूव्ही बाजारात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे लग्जरी सेगमेंटमध्ये ही एकमेव अशी कार आहे की जी ८ सीटर क्षमतेची आहे. तसंच भारतीय बाजारातील ही सर्वात मोठी बॉडी स्टाइल डिफेन्डर एसयूव्ही आहे.
भारतीय बाजारात याआधीपासूनच डिफेंडर ९० आणि ११० उपलब्ध आहे. आता डिफेंडर १३० दाखल झाली आहे. या कारची किंमत १.३० कोटी रुपयांपासून सुरू होते तर टॉप व्हेरिअंटची किंमत १.४१ कोटी (एक्स-शोरुम) पर्यंत जाते. ही एसयूव्ही एकूण दोन व्हेरिअंटमध्ये सादर केली गेली आहे. यात HSE आणि X ट्रिम्स यांचा समावेश आहे.
कंपनीनं कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजीनमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. थ्री-रो सेगमेंटमधील या कारमध्ये ८ लोक सहज प्रवास करू शकतात. यामुळेच ही एसयूव्ही इतर महागड्या एसयूव्हींच्या तुलनेत वेगळी ठरते. सी-पीलर डिझाइनवर आधारित ही एसयूव्हीचा व्हीलबेस खूप लांब आहे. ज्यामुळे केबीनच्या आत खूप स्पेस मिळते. याशिवाय डिफेंडर ११० च्या तुलनेत ही कार 340mm अधिक लांब आहे.
जबरदस्त फिचर्स आणि केबिन
डिफेंडर १३० मध्ये कंपनीनं लग्जरी एसयूव्हीमधील सर्व फिचर्स दिले आहेत. यात स्टेडियम स्टाइल सीटिंग अरेंजमेंट पाहायला मिळते. जसं की सेकंड आणि थर्ड रोमधील सीट्स थोड्या उंचीवर देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन फ्रंट विजिब्लिटी मिळू शकेल. तिन्ही रोमधील प्रवासी आरामदायक प्रवास करू शकतात असा कंपनीनं दावा केला आहे.
कारमध्ये फोअर झोन एअर कंडिशन सिस्टम देण्यात आली आहे. त्यामुळे कारमधील प्रत्येक व्यक्तीला कुलिंगची सुविधा मिळते. तसंच यात ११.४ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. जो लेटेस्ट पीव्ही-प्रो सॉफ्टवेअरनं सुसज्ज आहे. याशिवाय फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल फ्रंट सीट, ३६०-डीग्री सराऊंडेड कॅमेरा, मॅक्ट्रिक्स LED हेडलाइट, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस चार्जिंग, मेरिडियन ऑडियो सिस्टम आणि २० इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.