शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

KTM, रॉयल एन्फिल्डला टक्कर; 'या' कंपनीनं लाँच केल्या फीचर्सनं भरलेल्या तुफान 350cc बाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:15 IST

जबरदस्त इंजिन आणि पाहा काय मिळतायत आणखी फीचर्स. टीएफटी स्क्रीनवर पाहता येणार व्हिडीओ.

Guangdong Tayo मोटरसायकल टेक्नॉलॉजी ब्रँडने भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन Zontes 350 श्रेणीच्या मोटरसायकल लाँच केल्या आहेत. या सर्व बाइक 350cc सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आल्या आहेत. कंपनीने या सेगमेंटमध्ये नेकेड स्पोर्ट्स, स्पोर्ट्स, कॅफे रेसर, टूरर आणि अॅडव्हेंचर टूरर या पाच बाइक्स लाँच केल्या आहेत. या बाइक्समध्ये कीलेस इग्निशन, स्लिपर क्लच, टीएफटी स्क्रीन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि चार राइडिंग मोड यांसारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. भारतीय बाजारपेठेत या बाइक्स रॉयल एनफिल्ड हिमालयन, केटीएम आणि येझदीच्या ॲडव्हेन्चर मॉडेल्सशी टक्कर देतील.

कसं आहे इंजिन?सर्व बाईक्समध्ये बॉश EFI प्रणालीसह 348cc सिंगल-सिलिंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे 9,500rpm वर 38hp पॉवर आणि 7,500rpm वर 32Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सर्व मोटारसायकल्सना सारखेच हार्डवेअर आणि कंपोनंट्स देण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्या डिझाईन आणि स्टाईलमध्ये फरक आहे.

सर्व मॉडेल्समध्ये फ्रन्टला 320mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 265mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. याशिवाय स्टँडर्ड युअल-चॅनेल ABS देखील उपलब्ध आहे. मोटारसायकलच्या पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेंशन आहे. बाईक मजबूत आणि हलकी होण्यासाठी अॅल्युमिनियमचे व्हिल्स देण्यात आले आहेत.

काय आहेत फीचर्स?या बाइक्समध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाइट्स आणि एलईडी ब्लिंकर आहेत. 4 रायडिंग मोड, कीलेस कंट्रोल सिस्टीम, दोन फास्ट चार्जिंग यूएसबी पोर्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, नोटिफिकेशन्स, स्क्रीन मिररिंग, टेल लाईट्स, कलर एलसीडी डिस्प्लेसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कायआहेआहेकिंमत?कंपनीच्या ब्लू शेडची सुरुवातीची किंमत 3.15 लाख रुपये आहे. ब्लॅक अँड व्हाईट शेडची किंमत 3.25 लाख रुपये आहे. Zontes 350 X ब्लॅक आणि गोल्ड व्हेरियंटची किंमत 3.35 लाख रुपये आहे. तर सिल्व्हर-ऑरेंज आणि ब्लॅक-ग्रीन व्हेरियंटची किंमत 3.45 लाख रुपये आहे. कॅफे रेसर मॉडेल Zontes GK350 च्या ब्लॅक-ब्लू व्हेरिएंटची किंमत 3.37 लाख रुपये आहे. तर ब्लॅक-गोल्ड आणि व्हाइट-ऑरेंजची किंमत 3.47 लाख रुपये आहे.

Zontes 350 T फक्त दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याच्या ऑरेंज व्हेरिएंटची किंमत 3.37 लाख रुपये आहे आणि शॅम्पेन शेडची किंमत 3.47 लाख रुपये आहे. अॅडव्हेंचर टूरर मॉडेल दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे, ऑरेंज मॉडेलसाठी 3.57 लाख रुपये आणि शॅम्पेन मॉडेलसाठी 3.67 लाख रुपये मोजावे लागतील. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.

टॅग्स :bikeबाईकIndiaभारत