शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 20:30 IST

Kinetic DX Electric Scooter: या स्कूटरने ४१ वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला होता.

Kinetic DX Electric Scooter: १९८४ मध्ये  Kinetic Engineering आणि Honda यांनी संयुक्तपणे लॉन्च केलेली Kinetic DX स्कूटर आता ४० वर्षांनंतर इलेक्ट्रिक स्वरुपात कमबॅक करत आहे. ही भारतातील पहिली टू-स्ट्रोक ऑटोमॅटिक स्कूटर होती. त्यावेळी ही स्कूर प्रचंड लोकप्रिय झाली. आता फिरोदिया ग्रुप या स्कूटरला इलेक्ट्रिक अवतारात बाजारात आणणार आहे. 

गेम चेंजर स्कूटर होती Kinetic Honda DXKinetic Honda DX अशा वेळी बाजारात आणण्यात आली होती, जेव्हा भारतातील दुचाकी विभाग वेगाने बदलत होता. त्यावेळी वेस्पा आणि बजाज सारख्या स्कूटरमध्ये मॅन्युअल गियर चेंबर वापरले जात होते, तर कायनेटिक डीएक्सने पूर्णपणे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह एक नवीन दिशा दाखवली.

९८ सीसी इंजिन, ७.७ एचपी पॉवर आणि ९.८ एनएम टॉर्कसह या स्कूटरने एक उत्तम ड्रायव्हिंग अनुभव दिला. त्याच्या सीव्हीटी (कंटिन्युअली व्हेरिअबल ट्रान्समिशन) तंत्रज्ञानामुळे स्कूटर चालवणे खूप सोपे झाले. एवढेच नाही, तर या स्कूटरमध्ये सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्टसारखे पर्याय देण्यात आले होते. हे त्या त्या काळातील इतर स्कूटरमध्ये उपलब्ध नव्हते. त्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, स्कूटरचा देखभाल खर्च फक्त ₹२१ प्रति महिना असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये स्पेअर पार्ट्स आणि लेबर चार्जेस सामील होते.

Kinetic Honda DX पुन्हा येतेय

आता देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटला गती मिळत असल्याने, कायनेटिक ग्रीन ब्रँड पुन्हा एकदा ही संस्मरणीय स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या स्कूटरच्या नवीन डिझाइनचे पेटंट घेतले असून, अलीकडेच ही स्कूटर चाचणी दरम्यान दिसून आली आहे. या नवीन कायनेटिक डीएक्स ईव्ही स्कूटरमध्ये जुना रेट्रो लूक मोठ्या कायम ठेवण्यात आला आहे. तसेच, त्यात रुंद हेडलॅम्प, लांब सीट आणि स्टायलिश फ्रंट एप्रन मिळेल.

कधी लॉन्च होणार?

Kinetic Honda DX इलेक्ट्रिक स्कूटर येत्या २८ जुलै २०२५ रोजी लॉन्च केली जाईल. सध्या स्कूटरची किंमत, पॉवरट्रेन, बॅटरी स्पेसिफिकेशन किंवा रेंजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु ऑटो तज्ञांचा असा विश्वास आहे की, ही स्कूटर भारतीय बाजारात असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना कडक स्पर्धा देईल. भारतीय ईव्ही बाजारात या स्कूटरची बजाज चेतक ईव्ही, टीव्हीएस आयक्यूब, हिरो विडा व्ही१ आणि ओला एस१ एक्स+ आणि प्रो मॉडेल्स सारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्सशी थेट स्पर्धा असेल.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन