शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

708Km ची रेंज आणि मोबाईलपेक्षाही लवकर होईल चार्ज! या इलेक्ट्रिक कारच्या बुकिंगला सुरुवात, मिळतेय मोठी ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 4:46 PM

Kia EV6 : या कारचे बुकिंग सुरू करण्याबरोबरच कंपनीने सुरुवातीच्या ग्राहकांसाठी काही ऑफर्सदेखील आणल्या आहेत.

Kia India ने पुन्हा एकदा नव्या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरच्या बुकिंगला सुरूवात केली आहे. Kia EV6 ने गेल्या वर्षी जून महिन्यात भारतात डेब्यू केले. तेव्हापासूनच या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारचे बुकिंग पुन्हा एकदा सुरू केले जात असून, ही कार आता देशातील 44 शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. या प्रीमियम इलेक्ट्रिक क्रॉसओवरची किंमत 60.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. या कारचे बुकिंग सुरू करण्याबरोबरच कंपनीने सुरुवातीच्या ग्राहकांसाठी काही ऑफर्सदेखील आणल्या आहेत.

सुरुवातीच्या ग्राहकांसाठी खास ऑफर : Kia EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर बुक करणारे पहिले 200 ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. या ऑफरअंतर्गत त्यांना कार खरेदी केल्यानंतर 30 दिवसांच्या आत 95 टक्के बायबॅक पॉलिसीचा लाभ मिळेल. अर्थात, जर ग्राहकांना कार आवडली नाही तर ते 30 दिवसांच्या आत ती परतही करू शकतात. यानंतर कंपनी त्यांना 95 टक्के पैसे परत करेल. याच बरोबर, 5 वर्षांची मोफत सर्व्हिसिंग आणि 8 वर्षांपर्यंत अथवा 1.60 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटीही मिळेल. ही वॉरंटी कारच्या बॅटरीवर असेल.

कशी आहे नवी Kia EV6? - Kia EV6 इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) बेस्ड आहे. यात, कंपनीने 77.4 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये 708 किलोमीटरच्या (ARAI) सर्टिफाइड रेंजसह येतो. ही इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. सिंगल मोटर असलेले RWD व्हर्जन 229 bhp आणि 350 Nm जनरेट करते तर डुअल मोटर सेट-अप असलेले AWD व्हेरिअंट 325 bhp एवढी पॉवर आणि 605 Nm एवढा पीक टॉर्क जनरेट करते.

मोबाइल पेक्षाही फास्ट चार्जिंग - या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरची बॅटरी अल्ट्रा-फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, जी 4.5 मिनिटांतच बॅटरी एवढी चार्ज करते की, ही कार 100 किलोमीटरपर्यंत रेंज जेऊ शकेल. कंपनीचा दावा आहे की 350 KW DC फास्ट चार्जरने ही बॅटरी केवळ 18 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होते. तसेच 50 KW DC चार्जरसह 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी सुमारे 73 मिनिटे एवढा वेळ लागतो. मोबाईलचा विचार करता, सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध असलेले एखादे मॉडेल सोडल्यास, बहुतेक स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी 18 मिनिटांपेक्षाही अधिक वेळ लागतो.

 

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन