शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kabira Mobility Intercity Aeolus ची रेंज 110 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:43 IST

Kabira Mobility Intercity Aeolus : कबीरा मोबिलिटीने ही स्कूटर 71,490 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली)  बाजारात आणली आहे.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करण्याचा विचार असाल तर तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये जास्त रेंजचा एक पर्याय आहे. हा म्हणजे कबीरा मोबिलिटी इंटरसिटी एओलस ( Kabira Mobility Intercity Aeolus). कमी बजेटमध्ये जास्त रेंज असलेली ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आम्ही तुम्हाला या स्कूटरची किंमत सांगू तसेच तुम्हाला स्कूटरमधील बॅटरी पॅक, रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल माहिती सांगू जेणेकरून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना कोणती अडचण येणार नाही.

कबीरा मोबिलिटीने ही स्कूटर 71,490 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली)  बाजारात आणली आहे. ऑनरोड ही किंमत 84,615 रुपये होते. या स्कूटरमध्ये 60V, 35Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरीसोबत 250W पॉवर आउटपुट असलेली BLDC मोटर जोडलेली आहे. बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 4 ते 6 तासांत फूल चार्ज होते. कंपनी या बॅटरी पॅकवर 3 वर्षांची वॉरंटी आणि मोटरवर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.

स्कूटरची रेंज...स्कूटरच्या रेंजबद्दल, कबीरा मोबिलिटीचा दावा आहे की एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 110 किमीची रेंज देते. या रेंजसह 24 kmph चा टॉप स्पीड मिळतो. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही व्हीलमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन बसवले आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर स्प्रिंग-लोडेड सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग-आधारित शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम देण्यात आली आहे.

स्कूटरमधील फीचर्स...फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार्जिंग पॉइंट, फास्ट चार्जिंग, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, जिओ फेन्सिंग, लाइव्ह ट्रॅकिंग, अँटी थेफ्ट आणि एसओएस, ट्रिप हिस्ट्री, राइड स्टॅटिक्स, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन