या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 20:43 IST2025-09-26T20:39:14+5:302025-09-26T20:43:23+5:30
जाणून घेऊयात गेल्या महिन्यातील या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री झालेल्या 10 कार संदर्भात...

या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
भारतीय वाहन बाजारपेठेत कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे. या वर्गात पुन्हा एकदा ह्युंदाई क्रेटाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये क्रेटाच्या पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनसह एकूण 15,924 युनिट्सची विक्री झाली. मात्र, गत वर्षाच्या याच काळात (ऑगस्ट 2024) 16,762 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. अर्थात विक्रीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीदेखील या सेगमेंटमध्ये क्रेटाचा दबदबा कायम आहे. तर जाणून घेऊयात गेल्या महिन्यातील या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री झालेल्या 10 कार संदर्भात...
36% ने घटली ग्रँड व्हिटाराची विक्री -
या सेग्मेंटच्या विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर टोयोटा हायरायडर राहिली. हायरायडरने तब्बल 39% वार्षिक वाढीसह 9,100 युनिट्सची विक्री केली. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिली मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा. या कारच्या विक्रीत तब्बल 36% एवढी मोठी घट नोंदवली गेली. या कारच्या केवळ 5,743 युनिट्सचीच विक्री झाली.
किआ सेल्टोस आणि टाटा कर्व –
चौथ्या क्रमांकावर असलेल्या किआ सेल्टोसची विक्री 28% घसरणीसह 4,687 युनिट्सवर स्थिरावली. तर पाचव्या क्रमांकावरील टाटा कर्वची विक्री 50% हूनही अधिक घसरली. हिच्या केवळ 1,703 युनिट्सचीच विक्री झाली.
होंडा एलिव्हेट आणि महिंद्रा BE 6 -
सहाव्या क्रमांकावरील होंडा एलिव्हेटच्या 1,660 युनिट्सची विक्री झाली, तर सातव्या स्थानावर आलेल्या महिंद्रा BE 6 चे 1,551 युनिट्स विकले गेले.
फॉक्सवॅगन, स्कोडा आणि MG ची स्थिती चिंताजनक -
आठव्या क्रमांकावर फॉक्सवॅगन टायगून 1,001 युनिट्सवर आली, हिच्या विक्रीत 38% ची घसरण झाली. तर नवव्या क्रमांकावरील स्कोडा कुशाकची स्थिती अधिकच खालावली असून तिची विक्री 47% ने कमी जाली असून केवळ 789 युनिट्सवर थांबली. या यादीतील शेवटच्या क्रमांकावर आहे MG ZS EV हिच्या केवळ 380 युनिट्सचीच विक्री होऊ शकली.