जग्वार लँडरोव्हरची पुर्वीपेक्षा ताकदवान Discovery Sport लाँच... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:39 PM2018-12-12T16:39:14+5:302018-12-12T16:40:05+5:30

जग्वार लँडरोव्हरने आपली 2019 मधील डिस्कवरी ही स्पोर्ट एसयुव्ही कार नव्य़ा ताकदवान इंजिनासह लाँच केली आहे.

Jaguar Landrover launches most powerful discovery sport 2019 ... | जग्वार लँडरोव्हरची पुर्वीपेक्षा ताकदवान Discovery Sport लाँच... 

जग्वार लँडरोव्हरची पुर्वीपेक्षा ताकदवान Discovery Sport लाँच... 

Next

मुंबई : जग्वार लँडरोव्हरने आपली 2019 मधील डिस्कवरी ही स्पोर्ट एसयुव्ही कार नव्य़ा ताकदवान इंजिनासह लाँच केली आहे. कंपनीने या एसयुव्हीची सुरुवातीची किंमत 44.68 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीने या कारमध्ये 2.0 लीटरचे इन्गेनियम हे डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन केवळ SE आणि HSE मॉडेलमध्येच मिळणार आहे.


जग्वारच्या या नव्या कोऱ्य़ा इंजिनामध्ये 180 पीएसची ताकद आणि 430 Nm चा टॉर्क तयार होतो. तर सर्वसाधारण इंजिनामध्ये 150 PS ताकद आणि 382Nm टॉर्क तयार होतो. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 240PS आणि 340Nm टॉर्क देणारे 2.0 लीटर इन्गेनियम इंजिन देण्यात आले आहे. 


टॉप व्हेरिअंट HSE मध्ये नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये डायनॅमिक डिझाईन पॅक देण्यात आले आहे. तसेच बॉडीसाठी स्टाईल किटही देण्यात आले आहे. शिवाय क्रोम- फिनिश्ड एक्झॉस्ट, काळ्या रंगात माठीमागील लायसेंन्स प्लेट प्लिंथ याणि रेड स्पोर्ट बॅजही देण्यात आला आहे. शिवाय HSE लक्झरी व्हेरिअंटमध्ये अद्ययावत टच प्रो इन्फोटेन्मेंन्ट सिस्टिम देण्यात आली आहे. ही सिस्टिम रेंज रोव्हर वेलारमध्ये टच प्रो ड्युओ सोबत येते. 

Web Title: Jaguar Landrover launches most powerful discovery sport 2019 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app