शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अतिवृष्टीमध्ये कारमध्ये गुदमरून होणारे मृत्यू टाळता येणं शक्य आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 07:00 IST

अतिवृष्टी व पूरासारख्या घटनांमध्ये वाहन वापरताना कोणत्या कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी, याचे खरे म्हणजे प्रशिक्षण वा माहितीपुस्तक काढण्याची गरज आहे की काय, असे वाटू लागले आहे.

ठळक मुद्देकारमध्ये पाणी शिरल्याने त्यातून बाहेर न पडू शकलेल्या तरुणीचा मृत्यू  हे भीषण वास्तव आहे.यासाठी कारमध्ये तातडीची काही साधने असण्याची गरज आहे.नव्या प्रकारच्या पॉवर विंडोच्या कार, दरवाजे ऑटोमॅटिक लॉक होणाऱ्या कारला मिळालेल्या सुविधा याच्या अधीन राहून चालणार नाही.

मंगळवारी २९ ऑगस्टला मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडल्याने अगदी हाहाकार माजला होता.रस्त्यांवर अनेक गाड्या पाण्यात व वाहतूककोंडीने अडकून ठप्प झाल्या होत्या अशाच प्रकारात सायननजीक प्रियेन या ३० वर्षीय वकिलाचा त्याच्या सॅन्ट्रो कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. २००५मध्ये पुराच्यावेळीही कारचे दरवाजे न उघडल्याने व काचाही खाली न सरकल्याने बाहेर पडू न शकल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहन वापरताना कोणत्या कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी, याचे खरे म्हणजे प्रशिक्षण वा माहितीपुस्तक काढण्याची गरज आहे की काय, असे वाटू लागले आहे.

मंगळवारीच सायनच्या पुलावर एक गाडी अशी अडकली होती, टुरिस्ट गाडीमध्ये एक महिला होती, एअर कंडिशनमध्ये सातत्याने काम करणाऱ्या आजकालच्या पिढीतील ही महिला काच खाली करायला तयार नाही, त्यामुळे छोट्या जागेत कारमधील एअर कंडिशनमुळे ती अस्वस्थ झाली, अखेर ड्रायव्हरवर संतापही तिने व्यक्त केला. पण अखेर काच थोडी उघडल्यानंतर तिला जरा बरे वाटले पण एअर कंडिशन न लावल्याने तिने ड्रायव्हरवर इतका वेळ अडकलेल्या परिस्थितीत आगपाखड चालूच ठेवली होती. वास्तविक अशा प्रकारच्या या घटनांमधून काही शिकण्याची गरज आहे.प्रियेन यांचा मृत्यू काय किंवा २००५ मध्ये कारमध्ये पाणी शिरल्याने त्यातून बाहेर न पडू शकलेल्या तरुणीचा मृत्यू काय, हे भीषण व वास्तव आहे. यासाठी कारमध्ये तातडीची काही साधने असण्याची गरज आहे. नव्या प्रकारच्या पॉवर विंडोच्या कार, दरवाजे ऑटोमॅटिक लॉक होणाऱ्या कारला मिळालेल्या सुविधा याच्या अधीन राहून चालणार नाही. त्याच बरोबर अशी स्थिती उद्भवली तर काच फोडण्यासाठी एक छोटी हातोडी, सीटबेल्ट कापण्यासाठी एक कात्री किंवा धारदार छोटा चाकू, टॉर्च, अग्निशामक स्प्रे, पिण्यासाठी पाणी, जखम झाल्यास,ताप वाटत असल्यास किमान आवश्यक प्रथमोपचार साहित्य या साधनाचा वापर करता येऊ शकतो. हे केवळ माहिती असून उपयोगाचे नाही, तर ही साधने कारमध्ये हाताला झटकन लागतील, अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. तसेच काच बंद असेल व ती उघडत नसले तर ती फोडण्यासाठी हत्यार हवेच. अशा प्रकारची आणीबाणीची स्थिती कधी उद्भवेल ते सांगता येत नाही, यासाठीच प्रत्येक कारचालक, मालक यांनी या साधनांना कारमध्ये नेहमी अद्ययावत स्थितीत ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान एखाद्याचा प्राण तरी वाचू शकेल.

टॅग्स :AutomobileवाहनMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार