कोट्यवधींची कमाई असूनही या RCB च्या टॉप क्रिकेटरकडे आहे फारच स्वस्तातली कार, किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:57 IST2025-05-31T16:52:45+5:302025-05-31T16:57:21+5:30
आयपीएल 2025 पूर्वी, आरसीबीने रजत पाटीदारला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. याच बरोबर, तो बीसीसीआयच्या ग्रेड सी कराराचाही भाग आहे. यामुळे त्याला बोर्डाकडून दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात.

कोट्यवधींची कमाई असूनही या RCB च्या टॉप क्रिकेटरकडे आहे फारच स्वस्तातली कार, किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 9 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या मुळे RCB चे चाहते अत्यंत आनंदात आहेत. दरम्यान, संघाचा कर्णधार रजत पाटीदारने चाहत्यांचे आभार मानले असून केवळ एक सामना शिल्लक आहे, त्यानंतर आपण एकत्रितपणे जल्लोष करूयात, असे म्हटले आहे. खरे तर रजतची जीवनशैली अत्यंत साधी आहे. या टॉप क्रिकेटरकडे कोणती कार असेल, याचा अंदाज आपण लावू शकता?
आयपीएल 2025 पूर्वी, आरसीबीने रजत पाटीदारला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. याच बरोबर, तो बीसीसीआयच्या ग्रेड सी कराराचाही भाग आहे. यामुळे त्याला बोर्डाकडून दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात. त्याचे कार कलेक्शनही अगदी साधारण आहे. रजतकडे ह्युंदाई आय20 कार आहे, या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7 लाख रुपयांपासून सुरू होते.
अशी आहेत ह्युंदाई आय20 ची वैशिष्ट्ये -
ह्युंदाई आय20 मध्ये, अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी महागड्या कारमध्ये दिसतात. यात 10.25 इंचांचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे, जे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येते. या कारमध्ये ७-स्पीकरचे जबरदस्त साउंड सिस्टिम देण्यात आले आहे, जे जबरदस्त संगिताचा अनुभव देते. या कारला पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि इलेक्ट्रिक सनरूफ देण्यात आले आहे.
याशिवाय, कारमध्ये ६ एअरबॅग्ज (मानक सुरक्षा वैशिष्ट्ये) आणि टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम) देखील देण्यात आली आहेत. याशिवाय, एअर प्युरिफायर आणि अॅम्बियंट लाइटिंगसारख्या वैशिष्ट्येही देणण्यात आली आहेत.
इंजिन आणि पॉवर -
ह्युंदाई i20 मध्ये एक 1.2 लिटरचे 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 83.13 हॉर्सपावरची पॉवर आणि 115 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये ग्राहकांना दोन ट्रान्समिशन पर्याय मिळतात. एक 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, जो क्लासिक ड्रायव्हिंगचा फील देतो आणि एक 6-स्पीड CVT (iVT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, जो स्मूद रायडिंगचा आनंद देतो.