शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

Genesis GV60 इलेक्ट्रीक एसयुव्ही सादर; लूक भन्नाट, 480 किमीची जबरदस्त रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 2:29 PM

Hyundai's Genesis GV60: जेनेसिस GV60 च्या इंटेरिअरमध्ये Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 सारख्याच समानता आहेत.

ह्युंदाई मोटर्सची लक्झरी वाहनांची कंपनी जेनेसिसने आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही Genesis GV60 चे डिझाईन सादर केले आहे. जेनेसिस कंपनीचे हे पहिले GV60 इलेक्ट्रीक वाहन आहे. या वर्षींच्या अखेरपर्यंत ही कार लाँच होणार आहे. (Genesis GV60, Hyundai’s luxury car brand’s first electric SUV, makes debut)

जेनेसिस GV60 एसयुव्ही ग्लोबल इलेक्ट्रीक मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) आधारित आहे. याचा वापर Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 मध्ये करण्यात आला आहे. GV80 आणि GV70 मॉडेलनंतर GV60 जेनेसिसची तिसरी एसयुव्ही आहे. GV80 आणि GV70 या इतर इंधनांच्या एसयुव्ही आहेत. जेनेसिस GV60 मध्ये 800V इलेक्ट्रिकल आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे. 350kW ची अल्ट्रा फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. GV60 ला जेनेसिस SUV ची लाईनअपमध्ये GV70 आणि GV80 च्या खाली सादर करण्यात आले आहे. या कारला जबरदस्त लूक देण्यात आला आहे. डिझाईन लँग्वेजचे नवीन रुप पहायला मिळेल. 

शील्डच्या आकारात फ्रंट ग्रीलच्या दोन्ही बाजुला दोन सिग्नेचर क्वाड हेडलँप देण्यात आले आहेत. कंपनीचा नवीन लोगो देखील दिसत आहे. जेनेसिस नुसार मोठ्या ग्रीलमुळे वेगवान होण्यात मदत मिळेल आणि उच्च क्षमतेची बॅटरी थंड ठेवण्यास मदत मिळेल. यामध्ये सिंगल पॅनेल शेल हुडदेखील देण्यात आला आहे. 

जेनेसिस GV60 च्या इंटेरिअरमध्ये Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 सारख्याच समानता आहेत. ड्युअल स्क्रीन डिजिटल डिस्प्ले डॅशबोर्डवर लावण्यात आला आहे. एका मोठ्या सेंटर कंसोलमध्ये स्टोरेज स्पेस आणि वाहनाचे कंट्रोल दोन्ही देण्यात आले आहेत. या ईलेक्ट्रीक एसयुव्हीमध्ये 58kWh आणि 77.8kWh ची बॅटरी देण्यात येईल. यामुळे ही एसयुव्ही 480 हून अधिक किमीची रेंज देईल. रियर-व्हील-ड्राइव सिंगल इंजिन मॉडेल 167 hp आणि 214 hp ताकदीचे लाँच केले जाईल. तसेच दोन इंजिन, फोर व्हील ड्राईव्ह मॉडेल 301 hp ताकद प्रदान करेल.  

टॅग्स :Hyundaiह्युंदाईelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन