शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

FASTag बाबत "ही" गोष्ट नक्की लक्षात ठेवा; अन्यथा वापर नसतानाही कापले जातील पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:05 IST

FASTag News : पेटीएमपासून ते विविध बँकांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

नवी दिल्ली - नववर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने वाहनधारकांसाठी फास्टॅग (FASTag )  अनिर्वाय केला आहे. देशभरामध्ये फास्टॅग लागू करण्यात आला आहे. या फास्टॅगचा वापर न करणाऱ्यांकडून सरकार दुप्पट दंड वसूल करत आहे. पेटीएमपासून (Paytm) ते विविध बँकांनी फास्टॅगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याचदरम्यान एक गोष्ट जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आताच लक्ष दिले नाही तर पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. ही महत्वाची गोष्ट म्हणजे कार बदलताना किंवा विकताना तुमच्या कारला लावलेला फास्टॅगला कसा डिअ‍ॅक्टिव्ह (Deactivate) म्हणजे निष्क्रिय करायचा या बाबत जाणून घेऊया. 

फास्टॅग घेताना त्याला आपण आपल्या वॉलेट किंवा बँक अकाउंटला लिंक करतो. ज्यामुळे टोल भरताना लागणारे पैसे आपोआप तुमच्या अकाउंटमधून कापले जातात. अशामध्ये जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा नवीन कार विकत घेत असाल त्यावेळी जुना फास्टॅग तुम्ही डिअ‍ॅक्टीव्ह केला पाहिजे. नाही तर त्या गाडीचा वापर कुणीही केला तर त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमधूनच कट होत राहतील. नोएडाचा रहिवासी अंकितने देखील अशीच चूक केली असून त्याला ती महागात पडली आहे. त्याने आपली कार विकली आणि कारवर लावलेला फास्टॅग काढून टाकायला तो विसरला. 

टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...

अंकितने ज्याला कार विकली होती त्याचा नंबर देखील त्याच्याकडून हरवला. अंकितने विकलेल्या कारचा वापर समोरची व्यक्ती करत होती आणि पैसे अंकितच्या अकाउंटमधून कट होत होते. अंकितने जेव्हा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली तेव्हा त्याला कळलं की त्याच्याकडे फास्टॅगमध्ये नोंद केलेला सीरियल नंबर नव्हता. सीरियल नंबर असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्ह करू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जेवढ्या कार आहेत त्यावर लावलेला फास्टॅगचा सीरियल नंबर तुमच्याकडे नोंद करुन ठेवणे खूप गरजेचं आहे.

‘फास्टॅग’ आहे ना?, वाचा नव्या तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती

जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा एक्सचेंजमध्ये देत असाल तर तुम्ही तुमच्या गाडीवरचा फास्टॅग काढून टाकणे योग्य असेल. काही कारणास्तव फास्टॅग राहिला तर त्यासाठी तुम्हाला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन फास्टॅगच्या टोल फ्री नंबर 1800-120-4210 वर कॉल करावा लागेल. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्ह करू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर लिंक येईल जिथे तुम्ही गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, फास्टॅगचा सीरियल नंबर टाकणे अनिर्वाय आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काय असतो फास्टॅग?

फास्टॅग हा एक टॅग किंवा स्टिकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करते.टोलनाक्यावरील कॅमेरा स्टिकरवरचा बारकोड स्कॅन करतो आणि टोल आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कापला जातो.वाहनधारकांना टोलनाक्यावर खोळंबावे लागत नाही. त्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. प्रवासही झटपट होतो.

कुठे मिळतो फास्टॅग?

- फास्टॅग ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येऊ शकतो.- ॲथॉराइज्ड बँकेतून अथवा ई-कॉमर्स व्यासपीठांवरूनही ऑनलाइन मिळू शकतो.- देशातील 23 ॲथॉराइज्ड बँका, भूपृष्ठ वाहतूक विभागाचे हजारो विक्री केंद्रे येथेही फास्टॅग तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. 

फास्टॅगची किंमत 

- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी फास्टॅगची किंमत 100रुपये एवढी निश्चित केली आहे. याशिवाय 200रुपये अनामत रक्कम भरावी लागते.- अनेक बँका आपल्याकडे ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी किरकोळ किमतीचे फास्टॅगही देऊ करतात.

 

टॅग्स :Fastagफास्टॅगIndiaभारतMONEYपैसा