दुचाकी वाहनांचा विमा खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; होईल फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 01:50 PM2022-04-26T13:50:27+5:302022-04-26T13:51:22+5:30

insurance policy for two wheeler : दुचाकीस्वारांसाठी (Two Wheelers Riders) विमा केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही तर अपघाताच्यावेळी देखील आवश्यक आहे.

if you want to buy an insurance policy for two wheeler then go through the tips | दुचाकी वाहनांचा विमा खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; होईल फायदा 

दुचाकी वाहनांचा विमा खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; होईल फायदा 

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्याच्या काळात दुचाकी हे सर्व वयोगटातील लोकांचे आवडते वाहन बनले आहे. अशा परिस्थितीत वाहनाच्या विम्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. दुचाकीस्वारांसाठी (Two Wheelers Riders) विमा केवळ आर्थिक सुरक्षाच देत नाही तर अपघाताच्यावेळी देखील आवश्यक आहे.

भारतात बहुतांश वेळ रस्त्यावर वाहने असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत दुचाकी वाहने ही लाखो लोकांची पसंती ठरतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. मात्र, दुचाकीचा विमा असणे गरजेचे आहे. यासोबतच कोणत्या दुचाकी विमा पॉलिसीमध्ये (Bike Insurance Policy) कोणत्या प्रकारचा फायदा मिळत आहे, हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.

पॉलिसी कस्टमाइज करू शकता
तुम्ही तुमची दुचाकी विमा पॉलिसी कस्टमाइज करू शकता. दुचाकी विमा पॉलिसी अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये वाहनाची इंजिन क्षमता, उत्पादनाचे वर्ष, मॉडेल आणि भौगोलिक स्थान अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही सर्व अॅड-ऑन कव्हरची यादी मिळवू शकता आणि वेगवेगळ्या विमा कंपन्यांची  (Insurance Companies) ऑनलाइन तुलना करू शकता.

कॅशलेस क्लेम करू शकता
तुम्ही तुमच्या दुचाकी विमा पॉलिसीसाठी कॅशलेस क्लेम देखील करू शकता. जर तुमची विमा पॉलिसी तुम्हाला तुमच्या दुचाकीसाठी कॅशलेस क्लेम करण्याची परवानगी देत ​​असेल, तर तुम्हाला फक्त वाहन एका गॅरेजमध्ये पाठवायचे आहे, ज्याचे कंपनीशी टाय-अप आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही.

नवीन चावी मिळेल मोफत
तुमच्या दुचाकीची चावी हरवली असेल तर तुम्ही विमा पॉलिसीसह त्यावर दावा करू शकता. आजच्या धकाधकीच्या जीवनात चावी हरवणे सामान्य गोष्ट आहे. जर तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल, तर तुम्हाला नवीन चावी मिळवण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तुमच्या विमा पॉलिसीमध्ये 'की प्रोटेक्ट' अॅड-ऑन पर्याय आहे, जो चोरी किंवा नुकसान झाल्यास हरवलेल्या चाव्यांचा खर्च कव्हर करतो. याशिवाय, कंपनी तुमच्या दुचाकीचे कुलूप आणि चावी बदलण्याची सुविधा देखील देते.

इंजिनचा विमा काढू शकता
दुचाकी वाहनात इंजिन हा अत्यंत महत्त्वाचा आणि खर्चिक भाग आहे. हे मूलभूत विमा योजनेत समाविष्ट नाही. मात्र, तुम्ही अर्थातच पॉलिसी कस्टमाइज करू शकता आणि 'बाईक इंजिन प्रोटेक्ट' अॅड-ऑन कव्हर खरेदी करून इंजिनचा विमा काढू शकता.

अपघातावेळी कायदेशीर संरक्षण
विमा संरक्षणासोबतच एखाद्याला कायदेशीर संरक्षणही मिळते. विमा पॉलिसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, पॉलिसी तुम्हाला कायदेशीर संरक्षण देते. अपघात झाल्यास आणि तृतीय पक्षांसोबत कायदेशीर समस्या असल्यास, विमा पॉलिसी दुचाकी मालकांच्या बचावासाठी येतात. अशा परिस्थितीत, थर्ड-पार्टी विमा पॉलिसी तुम्हाला कायदेशीर संरक्षण प्रदान करते.

Web Title: if you want to buy an insurance policy for two wheeler then go through the tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.