आणखी थोडी किंमत वाढविली असती तर ५० लाखच टच...! फोक्सवॅगनची नवीन एसयुव्ही भारतात लाँच झाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:39 IST2025-04-15T18:38:54+5:302025-04-15T18:39:12+5:30

फोक्सवॅगन इंडियाने भारतात नवीन स्पोर्ट एसयुव्ही टिगुआन आर-लाईन लाँच केली, पहा फिचर्स आणि किंमत...

If the price had been increased a little more, it would have been a touch of Rs 50 lakhs...! Volkswagen's new SUV launched in India... | आणखी थोडी किंमत वाढविली असती तर ५० लाखच टच...! फोक्सवॅगनची नवीन एसयुव्ही भारतात लाँच झाली...

आणखी थोडी किंमत वाढविली असती तर ५० लाखच टच...! फोक्सवॅगनची नवीन एसयुव्ही भारतात लाँच झाली...

फोक्सवॅगन इंडियाने भारतात नवीन स्पोर्ट एसयुव्ही टिगुआन आर-लाईन लाँच केली आहे. या कारची किंमत आणखी १ लाख १ हजारने वाढविली असती तर ती पन्नास लाखांची एक्स शोरुम किंमत कशीच टच केली असती. सध्या ही इंट्रॉडक्टरी किंमत असून भविष्यात ती वाढणार आहे, असे कंपनीनेच म्हटले आहे. 

ही कार पर्सिमॉन रेड मेटॅलिक, सिप्रेसिनो ग्रीन मेटॅलिक, नाईटशेड ब्लू मेटॅलिक, ग्रेनेडिला ब्लॅक मेटॅलिक, ओरिक्स व्हाइट विथ मदर ऑफ पर्ल इफेक्ट आणि ऑयस्टर सिल्व्हर मेटॅलिक या ६ रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. २३ एप्रिल २०२५ या कारची डिलिव्हरी सुरु होत आहे. १९-इंचाचे अलॉय व्हील्स, अँबियंट लाइटिंग (३० रंग), पॅनोरॅमिक सनरूफ, एअर-केअर क्लायमॅट्रॉनिक (३-झोन एअर-कंडिशनिंग), पार्क असिस्ट प्लससह पार्क डिस्टन्स कंट्रोल तसेच दोन फोन चार्ज होण्यासाठी  इंडक्टिव्ह चार्जिंग आदी फिचर्स देण्यात आले आहेत. 

या कारमध्ये २.०-लिटर टीएसआय इव्हो इंजिन देण्यात आले आहे. जे २०४ पीएस पीक पॉवर आणि ३२० एनएम टॉर्क देते. यामध्ये  ४ मोशन ऑल-व्हील ड्राइव्ह तसेच ७-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन मिळते. २१ लेव्हल २ अडास देण्यात आले आहे. ९-एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स आदी गोष्टी देण्यात आल्या आहेत. 

टिगुआन आर-लाइनमध्ये ३८.१ सेमी इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे. आठ स्पीकर्ससह इमर्सिव्ह साउंड सिस्टम देण्यात आली आहे. हाय स्पीडला चांगली स्थिरता देण्यासाठी डायनॅमिक चेसिस कंट्रोल फिचर देखील देण्यात आले आहे. 

Web Title: If the price had been increased a little more, it would have been a touch of Rs 50 lakhs...! Volkswagen's new SUV launched in India...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.