ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 20:50 IST2025-10-20T20:48:52+5:302025-10-20T20:50:33+5:30
ICC Womens World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या २१ व्या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या २१ व्या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. या सामन्यात ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. जागतिक स्तरावर हा पराक्रम करणारी ती २० वी महिला क्रिकेटपटू आहे.
HISTORY MADE! 🇱🇰👑
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 20, 2025
A massive congratulations to our trailblazer, Chamari Athapaththu, on becoming the first Sri Lankan and only the fourth Asian batter to cross the 4️⃣0️⃣0️⃣0️⃣ run mark in ODIs!
She also now holds the record for the most ODI caps for Sri Lanka! #CWC25#SLvBAN… pic.twitter.com/tXGtFvUnX5
२०१० पासून एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या चामारी अटापट्टूने १२० सामन्यांमध्ये ३५.१७ च्या प्रभावी सरासरीने ४ हजार ४५ धावा केल्या आहेत. या विक्रमामुळे, ती श्रीलंकेसाठी दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू शशिकला सिरीवर्धने (११८ सामन्यांत २ हजार २९ धावा) आणि तिसरी दिलीनी मनोदरा (१ हजार ३६३ धावा) यांच्यापेक्षा खूप पुढे गेली आहे.
सध्याच्या विश्वचषकात श्रीलंकेचा संघ संघर्ष करत आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. रद्द झालेल्या सामन्यांमुळे दोन गुण गमावून, श्रीलंका सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, बांगलादेश एका विजयासह सहाव्या स्थानावर असून, पाकिस्तान आठव्या स्थानावर आहे.