Hyundai Venue CNG: ह्युंदाई पॉप्युलर एसयुव्ही CNG मध्ये आणणार; मारुती, टाटाला टक्कर देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:41 IST2021-11-15T15:40:08+5:302021-11-15T15:41:11+5:30
Hyundai's CNG Cars: Hyundai Motors ला देखील भारतीय बाजारात पाय टिकवून ठेवायचे आहेत. मारुती एक नंबरला आहे. तर टाटा वेगाने वर येत आहे.

Hyundai Venue CNG: ह्युंदाई पॉप्युलर एसयुव्ही CNG मध्ये आणणार; मारुती, टाटाला टक्कर देण्याची तयारी
Upcoming Hyundai Venue CNG Launch India: भारतात पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमुळे सीएनजी किंवा इलेक्ट्रीक कारकडे भारतीय ग्राहक वळू लागले आहेत. यामुळे सीएनजीमध्ये किंग असलेल्या मारुतीने अन्य कारदेखील सीएनजीमध्ये आणण्याची तयारी केली आहे. यामुळे टाटा, ह्युंदाईने देखील आपल्या कार सीएनजीमध्ये आणण्याचे ठरविले आहे. येत्या काही काळात या नव्या सीएनजी कारचा पर्याय भारतीयांसमोर उभा असेल.
मारुती ब्रेझा सीएनजी (Maruti Brezza CNG), मारुती स्विफ्ट सीएनजी (Maruti Swift CNG), मारुती स्विफ्ट सीएनजी (Maruti Swift CNG) या कार सीएनजीमध्ये येणार आहेत. टाटादेखील नेक्सॉन सीएनजी (Tata Nexon CNG), टाटा टिएगो सीएनजी (Tata Tiago CNG) मध्ये आणणार आहे. परंतू देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेली कंपनी ह्युंदाईकडे फक्त तीनच कार सीएनजीमध्ये आहेत. यामुळे सर्वाधिक खपाच्या यादीतील कार ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue) सीएनजीमध्ये येणार आहे.
Hyundai Motors ला देखील भारतीय बाजारात पाय टिकवून ठेवायचे आहेत. मारुती एक नंबरला आहे. तर टाटा वेगाने वर येत आहे. यामुळे ह्युंदाई बेस्ट सेलिंग सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही ह्युंदाई व्हेन्यू सीएनजीमध्ये आणणार आहे. ह्युंदाईकडे सध्या सँट्रो आणि ऑरा व Hyundai Grand i10 Nios CNG या तीन कार सीएनजीमध्ये आहेत. देशात गेल्या काही महिन्यांत सीएनजी कारची विक्री जोरात होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने लोक सीएनजी आणि इलेक्ट्रीक कारकडे वळले आहेत. ह्युंदाई दर महिन्याला 4000 हून अधिक सीएनजी कार विकते. व्हेन्यू आल्यास यामध्ये वाढ होणार आहे.
ऑटोशी संबंधीत बातमी...