शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

Tata Punchची जादू जबरदस्त; आता Hyundai नवी कार लॉन्च करत देणार टक्कर, असं असेल नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 7:56 PM

Hyundai ची ही कार केवळ Tata Punch लाच नाही, तर Renault Kiger, Mahindra KUV100 आणि  Maruti Suzuki Ignis लाही टक्कर देईल.

टाटा मोटर्सची नवी कार Tata Punchने लोकांना एवढी भुरळ घातली आहे, की यामुळे इतर कंपन्यांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. यातच आता Hyundai Motors लवकरच पंचला टक्कर देणारी जबरदस्त कार घेऊन येत आहे.

येणार Hyundaiची नवी एसयूव्ही -Hyundai Motors लवकरच आपली नवी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही घेऊन येत आहे. ही कार 2023 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. कंपनीने ही कार भारतात आणण्याचीही प्लॅनिंग केली आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, हीचे कोडनेम Ai3 असे आहे.

कोरियात आली आहे अशी कार -Hyundai ने काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या बाजारात Hyundai Casper लाँच केले होते. ही कारही एक मायक्रो एसयूव्ही आहे. यात कंपनीने दोन पेट्रोल इंजिनचे पर्याय दिले आहेत. यांपैकी एक 1.0-लिटर मल्टी-पॉइंट इंजेक्शन पेट्रोल इंजिन तर दुसरे 1.0-लिटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन अनुक्रमे 75hp आणि 99hp मॅक्स पॉवर जेनरेट करतात.  

भारतीय बाजारात कंपनी Casper ला 1.2 लीटरच्या 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह देखील लॉन्च करू शकते. ही कार Hyundai च्या Grand i10 Nios प्रमाणेच 83hp पॉवर जनरेट करू शकते. 

Kiger, Ignis ला देणार टक्कर -Hyundai Ai3 अथवा Casper मध्ये अनेक अॅडव्हान्स फिचर्स असतील. ही कार केवळ Tata Punch लाच नाही, तर Renault Kiger, Mahindra KUV100 आणि  Maruti Suzuki Ignis लाही टक्कर देईल. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईTataटाटाcarकार