'टॉप मॉडेल'ची गरज नाही! ह्युंदाई व्हेन्यूच्या या व्हेरियंटमध्येच भरगच्च फीचर्स; कोणता व्हेरियंट खरेदी करावा, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:02 IST2025-11-06T13:00:25+5:302025-11-06T13:02:16+5:30
Hyundai Venue value for money : नवीन वेन्यूमध्ये HX2 (बेस) ते HX10 (टॉप) पर्यंत व्हेरियंट्स आहेत, तसेच N6 आणि N10 (N लाईन) व्हेरियंट्सही उपलब्ध आहेत.

'टॉप मॉडेल'ची गरज नाही! ह्युंदाई व्हेन्यूच्या या व्हेरियंटमध्येच भरगच्च फीचर्स; कोणता व्हेरियंट खरेदी करावा, जाणून घ्या!
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये जुनी झालेली कार नव्या स्वरुपात आणून ह्युंदाईने आपली नवीन वेन्यू बाजारात आणली आहे. छोटी क्रेटा असल्याने लोक तिकडे वळण्याची शक्यता आहे. अशातच या कारची किंमत ७.९० लाख रुपयांपासून १४ लाखांवर जात आहे. परंतू, या कारसाठी १४ लाख रुपये खर्च करण्याची गरज नाही. कारण टॉप व्हेरिअंटपेक्षा असे एक व्हॅल्यू फॉर मनी व्हेरिअंट आहे जे तुम्हाला गरजेचे बरेच फिचर्स देणार आहे.
नवीन वेन्यूमध्ये HX2 (बेस) ते HX10 (टॉप) पर्यंत व्हेरियंट्स आहेत, तसेच N6 आणि N10 (N लाईन) व्हेरियंट्सही उपलब्ध आहेत. परंतू बेस मॉडेलच एवढे भरलेले आहे की अनेकांना टॉप मॉडेल घेण्याची गरज पडणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने बेस मॉडेलमध्येच ६ एअरबॅग्ज स्टँडर्ड म्हणून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ही एसयूव्ही अधिक सुरक्षित झाली आहे.
कोणता व्हेरियंट आहे उत्तम डील?
HX2 (बेस मॉडेल - रु. ७.९० लाख): यात ६ एअरबॅग्ज, ABS सह EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), आणि १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखे महत्त्वपूर्ण फीचर्स मिळतात.
HX5 (मध्य-श्रेणी मॉडेल - रु. ९.१५ लाख पासून): HX2 च्या सर्व फीचर्ससह, या व्हेरियंटमध्ये सनरूफ, क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स (केवळ DCT आणि AT मध्ये) आणि स्मार्ट कीसह पुश बटण स्टार्ट/स्टॉप सारखे फीचर्स जोडले आहेत. ज्यांना कमी बजेटमध्ये सनरूफचा अनुभव हवा आहे, त्यांच्यासाठी हा व्हेरियंट उत्कृष्ट ठरू शकतो.
HX10 (टॉप मॉडेल - रु. १४.५६ लाख पासून): यात लेव्हल २ ADAS (Advanced Driver-Assistance Systems), बोस ८-स्पीकर साउंड सिस्टीम, ड्युअल १२.३-इंच कर्व्ह्ड डिस्प्ले आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स (केवळ N10 मध्ये) यांसारखे प्रीमियम फीचर्स आहेत. ज्यांना सुरक्षिततेची आणि लक्झरीची कोणतीही कमतरता नको आहे, त्यांनी याकडे पाहावे.
इंजिन पर्याय:
नवीन वेन्यूमध्ये १.२-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल (५-स्पीड मॅन्युअल), १.०-लीटर टर्बो-पेट्रोल (६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड DCT) आणि १.५-लीटर डिझेल (६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक) असे तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. केवळ ६ एअरबॅग्ज आणि इन्फोटेनमेंट स्क्रीनसह चांगली सुरक्षा हवी असल्यास HX2 हा एक परवडणारा आणि दमदार पर्याय आहे.