बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:36 IST2025-11-04T15:35:34+5:302025-11-04T15:36:33+5:30
Hyundai Venue 2025: ह्युंदाई व्हेन्यू २०२५ सात व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून एक्स-शोरूम किंमत ₹७.९० लाख पासून सुरू होत आहे.

बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मागे पडलेल्या ह्युंदाईने व्हेन्यू २०२५ हे क्रेटाचे छोटे नवे रुप लाँच करत मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. या नवीन मॉडलची एक्स-शोरूम किंमत ₹७.९० लाख पासून सुरू होते.
ह्युंदाई व्हेन्यू २०२५ सात व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून एक्स-शोरूम किंमत ₹७.९० लाख पासून सुरू होत आहे. टॉप-एंड HX10 व्हेरिएंटची किंमत अंदाजे ₹१४.५८ लाख पर्यंत जाते. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. बाहेरून स्पोर्टी वाटण्यासाठी थोडेसे एक्स्टर सारखे चाकांवरील भागात फुगीर लुक देण्यात आला आहे.
इंजिन आणि मायलेज
नवीन व्हेन्यू तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:
| इंजिन प्रकार | पॉवर | ट्रान्समिशन पर्याय | मायलेज (अंदाजित) | 
| १.२-लीटर पेट्रोल (नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड) | ८३ बीएचपी | ५-स्पीड मॅन्युअल | १८.०५ किमी/लीटर | 
| १.०-लीटर टर्बो पेट्रोल | १२० बीएचपी | ६-स्पीड मॅन्युअल/७-स्पीड डीसीटी | २० किमी/लीटर (MT) | 
| १.५-लीटर डिझेल | ११६ बीएचपी | ६-स्पीड मॅन्युअल/ऑटोमॅटिक | २०.९० किमी/लीटर (MT) | 
नव्या व्हेन्यूमध्ये लांबी तेवढीच ठेवण्यात आली असून रुंदी आणि उंची वाढविण्यात आली आहे. यामुळे केबिनमध्ये जास्त जागा मिळणार आहे. या कारमध्ये प्रीमियम लूकसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन आयताकृती ग्रिल, सुधारित बंपर, क्वाड-बीम एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत.
हायटेक करण्यासाठी दोन १२.३-इंच स्क्रीन देण्यात आल्या असून दोन टप्प्यात मागे-पुढे झुकणाऱ्या मागील सीट्स देखील देण्यात आल्या आहेत. यामुळे गरजेनुसार बुटस्पेसही वाढविता येणार आहे. यामध्ये ८-स्पीकर बोस साउंड सिस्टम देण्यात आली आहे.
ADAS सह सुरक्षा: 
सुरक्षेच्या दृष्टीने यात लेव्हल २ ADAS सूट देण्यात आला आहे, ज्यात लेन कीप असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि फॉरवर्ड कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट सारखे फीचर्स आहेत.