शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Hyundai Nexo: पहिली हायड्रोजन कार देशात लाँच होण्याची शक्यता; धुराच्या जागी करणार पाण्याचं उत्सर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 18:42 IST

666 किलोमीटर रेंजसह मिळणार अनेक विशेष फीचर्स

ठळक मुद्दे666 किलोमीटर रेंजसह मिळणार अनेक विशेष फीचर्सभारतात ही कार लाँच झाल्यास ठरणार पहिली हायड्रोजन कार

Hyundai Nexo Hydrogen Car: सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमुळे खिशावर ताण पडत आहे. परंतु लवकरच देशात एका नव्या प्रकारच्याकारमध्ये प्रवास करण्याची संधी मिळू शकते. दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai ला आपल्या नव्या फ्युअल सेल इलेक्ट्रिक एसयूव्ही Nexo साठी मंजुरी मिळाली आहे. याव्यतिरिक्त लवकरत ही कार भारतीय बाजारपेठेतही लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार कंपनी आपली नवी हायड्रोजन पॉवर्ड Hyundai Nexo ही कार यावर्षी भारतीय बाजारपेठेत उतरवू शकते. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जर ही कार लाँच झाली तर ही देशातील पहिली हायड्रोजन पॉवर्ड कार असेल. कंपनीनं आपली ही फ्युअल सेल इलेक्ट्रिक एसयूव्ही गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली होती. मोबिलिटीचा हा सर्वात उत्तम पर्याय असल्याचंही कंपनीनं म्हटलं होतं. Hyundai Nexo मध्ये कंपनीनं 95kW क्षमतेच्या फ्युअल सेल आणि 40kW क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर केला आहे. यामध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर कारला पॉवर देते. ते जवळपास 161bhp ची पॉवर आणि 395Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये हायड्रोजनचे तीन टँक देण्यात आले असून या माध्यमातून ही कार 666 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. स्पीड आणि ड्रायव्हिंग रेंजया कारचे हायड्रोजन टँक पाच मिनिटांच्या आत रिफिल केले जाऊ शकतात. फ्युअल सेल कोणत्याही प्रकारच्या वातावरणात उत्तमरित्या काम करू शकतात असा दावा कंपनीनं केला आहे. या कारचा टॉप स्पीड 179 किलोमीटर प्रति तास इतका आहे.फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर एसयूव्ही हायवे ड्रायव्हिंग असिस्ट, लेन फॉलोविंग असिस्ट, रिमोट पार्किंग असे फीचर्स यात देण्यात आले आहेत.  याशिवाय ही एसयूव्ही दोन इंटिरिअर कलर्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मेट्योर ब्ल्यू आणि ड्युअल टोन स्टोन आणि शेल ग्रे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. याशिवाय यात 12.3 इंचाचा LCD स्क्रिनदेखील देण्यात आला आहे. ही एसयूव्ही भारतात लाँच करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. Toyota Mirai ही जगातील पहिली हायड्रोजन फ्युअल सेल कार आहे. याची विक्री कमर्शिअली 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.

टॅग्स :AutomobileवाहनHyundaiह्युंदाईcarकारWaterपाणीElectric Carइलेक्ट्रिक कार