शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Hyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:41 IST

ह्युंदाईने एक्ससेंटच्या जागी नवीन कॉम्पॅक्ट सेदान कार AURA लाँच केली आहे.

ठळक मुद्देकेबीन ड्युअल टोन रंगात असून मोठी 8.0 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.या कारमध्ये तीन प्रकारचे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन असणार आहे.

ह्युंदाईने एक्ससेंटच्या जागी नवीन कॉम्पॅक्ट सेदान कार AURA लाँच केली आहे. नवीन डिझाईन, रंग आणि वायरलेस चार्जर सारख्या अद्ययावर सुविधा या कारमध्ये देण्यात आल्या आहेत. 

ह्युंदाईच्या ऑरामध्ये ड्रायव्हर रिअर व्ह्यू म़ॉनिटर, लेदरचा गिअर नॉब, इको कोटींग, इमरजन्सी स्टॉप सिग्नल, एअर कर्टन आदी देण्यात आले आहे. 

केबीन ड्युअल टोन रंगात असून मोठी 8.0 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले आहे. रिअर सीट आर्मरेस्टही देण्यात आला आहे. 5.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, अॅटो क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट, आरकिम्सचे 4 स्पीकर म्युझिक सिस्टिम आणि किलेस एन्ट्री अशा सुविधा देण्यात आल्या आहेत यापैकी बऱीच फिचर या सेगमेंटमध्ये पहिल्यादाच आली आहेत. 

ह्युंदाईची ही नवीन कार फेअरी रेड, पोलर व्हाईट, टायफून सिल्व्हर, टायटन ग्रे, अल्फा ब्ल्यू आणि व्हिंटेज ब्राऊन या रंगामध्ये येणार आहे. 

या कारमध्ये तीन प्रकारचे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन असणार आहे. बीएस 6 चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 83 पीएसची ताकद देणार असून 20.5 किमी प्रती लीटरच्या मायलेजचा दावा केला आहे. तसेच 1.0 लीटरचे टर्बो इंजिन देण्यात आले आहे. डिझेलमध्ये 1.2 लीटरचे इंजिन देण्यात आले असून इको टर्बो टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. 

साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली

मारुती इको बंद होणार ही अफवाच; नवीन सुरक्षित कार लाँच

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

पुढे दोन एअरबॅग, एबीएस, ईबीडी, पार्किंग सेन्सर आदी सुरक्षेची फिचर देण्यात आली आहेत. किंमत 5.79 लाखांपासून सुरू होत असून डिझेलचे वरचे मॉडेल 9.22 लाख रुपयांना एक्स शोरूम ठेवण्यात आली आहे. 1.2 लीटरच्या इंजिनामध्ये सीएनजीचा पर्यायही देण्यात आला आहे. ही कार मारुती सुझुकीच्या डिझायर, फोर्डच्या अस्पायर, होंडाच्या अमेझला टक्कर देणार आहे. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकी