शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

Hyundai Exter : ह्युंदाईची नवीन SUV टाटा पंचला देणार टक्कर, टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 13:50 IST

कंपनीने नवीन एसयूव्हीच्या टीझरमध्ये मॉडेल दाखवलेले नाही. पण येत्या काही महिन्यांत कारची विक्री सुरू होणार असल्याची पुष्टी झाली आहे. 

नवी दिल्ली : ह्युंदाई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) आपल्या आगामी एसयूव्हीच्या (SUV) नावाचा खुलासा केला आहे. आता ही एसयूव्ही ह्युंदाई एक्सटर (Hyundai Exter) या नावाने लाँच केली जाईल. Hyundai च्या इंडिया लाइनअपमधील ही आठवी कार असणार आहे. ही कार मार्केटमध्ये आल्यानंतर टाटा पंचला टक्कर देऊ शकते. कंपनीने नवीन एसयूव्हीच्या टीझरमध्ये मॉडेल दाखवलेले नाही. पण येत्या काही महिन्यांत कारची विक्री सुरू होणार असल्याची पुष्टी झाली आहे. 

कार ऑगस्ट 2023 मध्ये लाँच होईल अशी शक्यता आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, ह्युंदाईची नवीन कार कंपनीची सर्वात छोटी एसयूव्ही असणार आहे. कारची लांबी देखील जवळपास 3.8 मीटर असणे अपेक्षित आहे. तसेच, कारची किंमत देखील परवडणाऱ्या श्रेणीत असणार आहे. कार कंपनीच्या लाइनअपमधील व्हॅन्यूपासून खाली ठेवले जाईल. Hyundai Exter ही Grand i10 Nios हॅचबॅकच्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. 

सध्या याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र कारची बरीचशी माहिती लीक झाली आहे. कंपनीने एसयूव्हीची चाचणी सुरू केली आहे आणि ती अनेक वेळा स्पॉट झाली आहे. यामध्ये राउंड फॉग लॅम्प, एच पॅटर्न एलईडी डीआरएल, कंपनीचे सिग्नेचर ग्रिल आणि स्प्लिट हेडलॅम्प मिळू शकतात. यासोबत कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात.

फीचर्सलीक्सनुसार, या एसयूव्हीचे इंटीरियर i10 आणि Venue सारखे असणार आहे. फीचर्सच्या बाबतीत, हे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटसह येऊ शकते, जे Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह येईल. यामध्ये सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अनेक कनेक्टेड कार फीचर्स मिळू शकतात.

इंजिनHyundai Exter मध्ये 1.2 लीटर आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला जाऊ शकतो. यासोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय मिळतील.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन