शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

6 एअरबॅग असलेली 'Hyundai Exter' कार, टाटाच्या टॉप सेलिंग कारला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:02 IST

ह्युंदाईच्या आगामी कारचे फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती जाणून घ्या...

नवी दिल्ली : सध्या ऑटो मार्केटमध्ये एसयूव्हीला ( SUV) मोठी मागणी आहे. या सेगमेंटमधील कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, अनेक कार उत्पादक या सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहेत. आता यातच ह्युंदाई (Hyundai) सुद्धा आपली नवीन SUV Exter बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाईची एक्स्टर 10 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच आजपासून तीन दिवसांनी ही कार तुम्हाला बाजारात पाहायला मिळणार आहे. आगामी कार टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पंचला टक्कर देऊ शकते. त्यामुळे ह्युंदाईच्या आगामी कारचे फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती जाणून घ्या...

पॉवरट्रेनरिपोर्ट्सनुसार, Hyundai Exter मध्ये तुम्हाला 1.2-लीटर VTVT NA पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन सध्याच्या कार Venue, i20, Grand i10 Nios आणि Aura मध्ये आधीच मिळत आहे. दरम्यान, ह्युंदाई एक्स्टरसाठी इंजिनमध्ये थोडे ट्यून करू शकते. हे इंजिन 82bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कार 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशनसोबत कनेक्टेड होऊ शकते.

फीचर्स स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आगामी कारमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV असेल. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हीकल स्टॅबलिटी मॅनेजमेंट, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फीचर्स देखील कारमध्ये मिळू शकतील.

बुकिंगजर तुम्हाला ह्युंदाई एक्स्टर खरेदी करायची असेल, या आगामी कारचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. म्हणजेच कंपनीच्या अधिकृत साइटवरून तुम्ही स्वतःसाठी ही कार बुक करू शकता. ही कार बुक करण्यासाठी तुम्ही 11,000 रुपये टोकन रक्कम भरून ती बुक करू शकता. कारच्या बेस व्हेरिएंट आणि इतर व्हेरिएंटची किंमत 6 लाख रुपयांवरून 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनcarकार