Hyundai Creta launched in India; will give fight to MG Hector See Price | Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत

Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत

नवी दिल्ली : ह्युंदाईने भारतीय बाजारात क्रेटा ही एसयुव्ही नव्या अवतारात लाँच केली आहे. क्रेटाचे 5 व्हेरिअंट उपलब्ध असून 14 मॉडेल्स आहेत. यामध्ये  E, EX, S, SX  आणि SX (O) यांचा समावेश आहे. 


बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत. 
नव्या क्रेटामध्ये थ्रीडी कॅस्केडिंग ग्रील देण्यात आली असून त्यावर एलईडी हेडलाईटसोबत नवीन स्प्लिट डेटाईम रनिंग लँप दिला आहे. बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. 17 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स आणि पाठीमागे एलईडी टेललाईट देण्यात आले आहेत. 


अंतर्गत रचनेमध्येही मोठे बदल केले आहेत. 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन डिस्प्लेसोबत इन कार कंट्रोल्स देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन मल्टी फंक्षनल फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील आणि 7 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटोही देण्यात आला आहे. नव्या पिढीच्या या कारमध्ये ब्लूलिंक टेकसोबत 50 हून अधिक कनेक्टेड फिचर्स दिले आहेत. यामध्ये स्मार्टवॉच अ‍ॅप, पॅनारोमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट, इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशन मॉनिटर सिस्टिम आहे. याशिवाय एक रिअर व्ह्यू मॉनिटरही देण्यात आला आहे. 

या कारमध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल, 1.5 लीटर व्हीजीटी डिझेल आणि 1.4 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड अ‍ॅटोमॅटीक असे दोन गिअर बॉक्समध्ये ही कार उपलब्ध आहे. 
या कारची किंमत 9.9 लाखांपासून सुरु होत असून टॉप व्हेरिअंट 17.20 लाखांना एक्स शोरुम उपलब्ध आहे.

ही कार mg hector, kia seltos, मारुतीची breza आणि टाटा hariar ला टक्कर देणार आहे.

Web Title: Hyundai Creta launched in India; will give fight to MG Hector See Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.