शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ह्युंडाईच्या 'या' लोकप्रिय कारवर डिस्काउंट ऑफर; जाणून घ्या, खरेदीवर किती होईल बचत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:35 IST

ह्युंडाई इंडियाने फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या निवडक कारच्या विविध मॉडेल्सवर 33,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर जारी केला आहे.

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना सुरू होताच कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारची विक्री वाढवण्याच्या किंवा जुना स्टॉक क्लिअर करण्याच्या उद्देशाने आकर्षक सवलतीच्या ऑफर देणे सुरू केले आहे, ज्यामध्ये पहिले नाव ह्युंडाई इंडिया (Hyundai India) आहे. ह्युंडाई इंडियाने फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या निवडक कारच्या विविध मॉडेल्सवर 33,000 पर्यंत डिस्काउंट ऑफर जारी केला आहे.

ह्युंडाई इंडियाने जारी केलेल्या या डिस्काउंट ऑफरमध्ये कॅश ऑफर, एक्सचेंज बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देखील आहे. ह्युंडाई इंडियाची कार डिस्काउंट ऑफर फक्त 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध असणार आहे. जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात ह्युंडाई इंडियाची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याठिकाणी जाणून घ्या कंपनी कोणत्या कारवर किती सूट देत आहे.

Hyundai Aura ह्युंडाई ऑरा ही एक प्रीमियम सेडान कार आहे, ज्यावर कंपनी सीएनजी व्हेरिएंटवर 33,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटमध्ये 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी ह्युंडाई ऑरा सब-4 मीटर सेडानच्या इतर सर्व व्हेरिएंटवर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. जो सर्व मिळून एकूण 23,000 रुपये आहे.

Hyundai i20 ह्युंडाई i20 ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. ही कार स्पोर्टी डिझाइन आणि फीचर्समुळे लोकांना आवडते. फेब्रुवारीमध्ये ह्युंडाई इंडिया या कारच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर वेगवेगळे डिस्काउंट देत आहेत. तुम्ही ह्युंडाई i20 चे Sportz किंवा Magna व्हेरिएंट विकत घेतल्यास कंपनी 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.

Hyundai Grand i10 Niosह्युंडाई ग्रँड i10 नियोस ही ह्युंडाई कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. ही कार कंपनीने नुकतीच लॉन्च केली आहे. कंपनी फेब्रुवारी महिन्यात या हॅचबॅकवर 13,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटमध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

महत्त्वाची सूचना...ह्युंडाई इंडियाद्वारे तीन कारवर जारी केलेली डिस्काउंट ऑफर देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्न असू शकते. त्यामुळे या डिस्काउंटच्या ऑफर अंतर्गत कार खरेदी करण्यापूर्वी डिस्काउंट ऑफरचे संपूर्ण डिटेल्स मिळविण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा तुमच्या जवळच्या ह्युंडाई डीलरशिपला भेट द्या. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनcarकार