Hyundai Alcazar SUV in Trend before launch; Will make Global Debut Today In India | क्रेटाच्या भव्य यशानंतर ह्युंदाई घेऊन येत आहे... 7 सीटर Hyundai Alcazar

क्रेटाच्या भव्य यशानंतर ह्युंदाई घेऊन येत आहे... 7 सीटर Hyundai Alcazar

भारतातील दुसरी मोठी आणि मुळची दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्स भारतात प्रिमिअम ७ सीटर एसयुव्ही Hyundai Alcazar लाँच करणार आहे. सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार गेल्या काही काळापासून होत होती. ही नवीन एसयुव्ही येत्या जून 2021 मध्ये लाँच होणार आहे, त्यापूर्वीच या एसयुव्हीचे चाचणीवेळचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. (Hyundai’s new 7 seater, 3 row SUV will take on the MG Hector Plus, Mahindra XUV500 and the Tata Safari in the Indian market)

Fuel Saving Tips: पेट्रोल, डिझेल परवडत नाहीय, मग मायलेज कसे वाढवणार?; काही टिप्स...


ह्यंदाईकडे दोन एसयुव्ही असल्या तरी त्या पाच सीटरच आहेत. यामुळे टाटा सफारी, एमजी हेक्टर प्लस, महिंद्रा एक्सयुव्ही 500 सारख्या एसयुव्हींना टक्कर देण्यासाठी ह्युंदाईला नवीन कारची गरज होती. मारुतीकडे देखील दोन सात सीटर कार आहेत. यामुळे ह्युंदाईने सात सीटर एसयुव्ही भारतीय बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. (Hyundai Alcazar )

नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्स


ह्युंदाई अल्काझारमध्ये एसयुव्ही क्रेटाची काही फिचर मिळणार आहेत. दोन्हा कारचा प्लॅटफॉर्म एकच असणार आहे. फ्लॅटर रूफलाईन, एलईडी डीआरएल प्रोजेक्टेड हेडलँप, नवीन सी कॉलम, सी शेपड् एलईडी टेल लँप आणि नवीन डिझाईनचा बंपर आदी देण्यात येणार आहे. 


तसेच या कारला 18 इंचाचे व्हील्स देण्यात येण्याची शक्यता आहे. क्रेटाला 17 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. 

या कारमध्ये सहा आणि सात सीटरचा पर्याय़ देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच क्रेटापेक्षा जास्त मोठी 10.25 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल ऑटो डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेंसर ने युक्त असणार आहे. 

MG Moters कडून नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच; इंग्लिश नाही तर हिंग्लिश कमांड्सही देता येणार

इंजिन...
Hyundai Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बो-डिझेलचे इंजिन असेल. पेट्रोल इंजिन 138bhp ताकद आणि 250Nm चा टॉर्क प्रदान करेल. तर डिझेल इंजिन 113bhp ताकद आणि 250Nm टॉर्क प्रदान करेल. कंपनी यामध्ये 1.5-लीटर 4-सिलेंडर नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिनाचा देखील वापर करण्याची शक्यता आहे. 

Web Title: Hyundai Alcazar SUV in Trend before launch; Will make Global Debut Today In India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.