नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 03:06 PM2021-08-05T15:06:44+5:302021-08-05T15:09:58+5:30

Honda Car : होंडा लवकरच आपली नवी आणि स्वस्त सेडान कार भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. केवळ ५ हजार रूपयांत करता येणार बुक.

Hondas cheapest sedan amaze in the new look you can Book car online in 5 thousand rupees | नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक

नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक

googlenewsNext
ठळक मुद्देहोंडा लवकरच आपली नवी आणि स्वस्त सेडान कार भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. केवळ ५ हजार रूपयांत करता येणार बुक.

जपानची वाहन उत्पादक कंपनी होंडा लवकरच आपल्या स्वस्त कार Honda Amaze चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल भारतीय बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी ही नवी कार 18 ऑगस्टला बाजारात आणणार असून त्याची बुकिंगही सुरू करण्यात आलं आहे. 

ग्राहकांना ही कार कंपनीच्या अधिकृत वेबसाईटज्वारे तसंच अधिकृत डीलरशीपद्वारे बुक करता येणार आहे. तुम्हाला डीलरशीपवरून कार बुक करण्यासाठी २१ हजार रूपये भरून ती बुक करता येणार आहे. तसंच ऑनलाईन बुकींद्वारे केवळ ५ हजार रूपये भरून तुम्हाला ही कार बुक करता येईल. सध्या कंपनी आपल्या सेकंड जनरेशन मॉडेलची विक्री करत आहे. ही कंपनी बाजारात मारूती डिझायर, ह्युंदाई ऑरा आणि फोर्ड एस्पायरसारख्या मॉडेलला टक्कर देते. आता त्यांच्या नव्या अपडेटेड फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कंपनीनं काही नव्या फीचर्स आणि टेक्नॉलॉडीचा वापर करणार आहे. तसंच आपल्या सेगमेंटमध्ये ही कार अधिक उत्तम कामगिरी करू शकणार आहे. 

काय असू शकतात बदल?
होंडा अमेझमध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प, रिडिझाइन केलेले बंपर आणि नवीन अलॉय व्हीलही दिले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय कारमध्ये क्रोम एक्सेंटही वाढवलं जाऊ शकतो. यामध्येनव्या सीट अपहोल्स्ट्री मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या कॉम्पॅक्ट सेडानमध्ये नवे फीचर्सही जोडण्यात येऊ शकतात. होंडाच्या आगामी अमेझच्या सर्व व्हेरिअंटमध्ये फीचर्स स्डँडर्स बवनू शकते.

कंपनी कारमध्ये सध्याच्याच इंजिनचा वापर करण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध असलेली कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये कंपनीनं 1.2 लीटर क्षमतेच्या इंजिनचा वापर केला आहे. जे 88bhp ची पॉवर आणि 110Nm चा टॉर्क जनरेट करते. तसंच दुसरीकडे डिझेल व्हर्जनमध्ये 1.5 लीटर क्षमतेचं डिझेल इंजिनही देण्यात आलं आहे. जे 98bhp ची पॉवर आणि 200 Nm चा टॉर्क जनरेट करतेय ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. याचं पेट्रोल व्हर्जन 18 किलोमीटर आणि डिझेल व्हर्जन 24 किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज देतं.

Web Title: Hondas cheapest sedan amaze in the new look you can Book car online in 5 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.