शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पेट्रोल नव्हे, आता इथेनॉलवर चालणार Honda ची Activa; जाणून घ्या कंपनीचा प्लान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 17:52 IST

देशातील वाहन कंपन्यांनी फ्लेक्स फ्युअल तंत्रज्ञानावर गांभीर्यानं काम करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं.

नवी दिल्ली-

देशातील वाहन कंपन्यांनी फ्लेक्स फ्युअल तंत्रज्ञानावर गांभीर्यानं काम करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. फ्लेक्स फ्युअल संदर्भात आता Honda Motorcycles and Scooter India (HMSI) कंपनीनं सविस्तर योजना आखली आहे. येत्या काळात Honda Activa किंवा इतर कोणत्यातरी मोटारसायकलमध्ये फ्लेक्स फ्युअल तंत्रज्ञान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच मोटारसायकल पेट्रोल ऐवजी इथेनॉल किंवा इतर कोणत्या तरी पर्यायी इंधनावर चालू शकणार आहे. 

पेट्रोलमध्ये इथेनॉलचं किती प्रमाणात मिश्रण केलं जाऊ शकतं याचा अभ्यास कंपनीकडून सुरू आहे. वाहनाची कामगिरी आणि इंजिनवर कोणताही परिणाम होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. कंपनी गेल्या १० वर्षांपासून ब्राझीलमध्ये फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञान वापरत आहे आणि तिथं बरंच यश मिळालं आहे. होंडानं आतापर्यंत ७० लाखाहून अधिक फ्लेक्स-इंधन असलेल्या टू-व्हीलरची विक्री केली आहे. 

२०२४ मध्ये लॉन्च होण्याची शक्यताहोंडा कंपनी २०२४ मध्ये भारतात फ्लेक्स-फ्युअल इंधनावर चालणारी दुचाकी लॉन्च करण्याची शक्यता आहे. यावर अद्याप काम सुरू असून सध्या कंपनीनं इलेक्ट्रीक दुचाकी आणि बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केलं आहे. 

फ्लेक्स फ्युअलमुळे खर्च वाचणारफ्लेक्स फ्युअल इंजिनमुळे वाहनाला एकाहून अधिक इंधन वापरण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. फ्लेक्स फ्युअल इंजिनामुळे पेट्रोलसोबतच इथेनॉल, सीएनजी, बायो-एलएनजी आणि इलेक्ट्रीक पावरचा देखील वाहनात इंधन म्हणून वापर करता येईल. याला हायब्रिड इंजिन म्हणून ओळखता येईल. 

फ्लेक्स फ्युअलवर आधारित इंजिन आलं तर लोक आपली वाहनं इथेनॉलवरही चालवू शकणार आहेत. इथेनॉलची किंमत ६५ रुपये प्रतिलीटर इतकी आहे. तर पेट्रोलची किंमत सध्या शंभरीपार आहे. एक लीटर इथेनॉल ८०० ग्राम पेट्रोलएवढं काम करते. अशापद्धतीनं जर वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युअलचा पर्याय उपलब्ध झाला. तर प्रतिलीटर पेट्रोलचा खर्च २० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. 

टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहन