शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 10:53 IST

नवी होंडा NX500 सोबत दमदार इंजिन शिवाय, एक कमी क्षमतेचे इंडिनही दिले जाऊ शकते, असेही डिझाइन फाइलिंगमधून समोर आले आहे.

होंडाने नुकतीच अगदी नव्या NX500 मिड-साइज अ‍ॅडव्हेंचर बाईकचे डिझाइन फाईल केली आहे. यातून या बाईकचे डिझाइन समोर आले आहे. एवढेच नाही, तर कंपनीने काही दिवसांपूर्वीच NX500 नावही ट्रेडमार्क केले आहे. यावरून कंपनी लवकरच ही नवी अ‍ॅडव्हेंचर बाईक लॉन्च करू शकते, हे स्पष्ट होते. या नव्या होंडा बाईकसग सीबी500एक्सचे 471 सीसी लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन मिळू शकते. जे 47 बीएचपी एवढी शक्ती आणि 43.2 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. (Honda NX500 Mid Size Adventure Motorcycle)

कमी क्षमतेचे इंजिनही मिळण्याची शक्यता - नवी होंडा NX500 सोबत दमदार इंजिन शिवाय, एक कमी क्षमतेचे इंडिनही दिले जाऊ शकते, असेही डिझाइन फाइलिंगमधून समोर आले आहे. एवढेच नाही तर, या नव्या अ‍ॅडव्हेंचर बाईकला 184.4 सीसीचे सिंगल-सिलिंडर इंजिनही दिले जाऊ शकते. जे भारतात तयार झालेली होंडा सीबी 200एक्स आणि होंडा हॉर्नेट 2.0 ला दिले जाते. गेल्यावर्षी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियानेही एनएक्स200 नावाने ट्रेडमार्क नोंदवला होता. मात्र, येथे कंपनीने सीबी200एक्स लॉन्च केली.

होंडासाठी मोठी संधी? -होंडा सीबी200एक्स भारतीय ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. मात्र, ऑफ-रोडिंगचा विचार करता, हिचे सस्पेंशन फारसे दमदार नाही. ही बाईक विक्रीतही ठीक-ठाक प्रदर्शन करत आहे. भारतात एंट्री लेव्हल अ‍ॅडव्हेंचर बाईक्स अत्यंत पसंत केल्या जात आहेत. यात हिरो एक्सपल्स 200 4V चाही समावेश आहे. अशात होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियासाठी या सेगमेंटची विक्री वाढवीण्याची सुवर्णसंधी असू शकते. 

टॅग्स :Hondaहोंडाbusinessव्यवसायAutomobileवाहन